एक सेवाभावी उपक्रम;जनसेवक सचिन ढोणे यांचा पुढाकार.
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : गोर गरीब व गरजू लोकांना छोट्या छोट्या कामांसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नये म्हणून समाधान सेतू हा सेवाभावी व अभिनव उपक्रम सुरू करून जनतेला समर्पित केला आहे. समाधान सेतूच्या माध्यमातून गोर गरीब व गरजू लोकांना नगरपरिषद कार्यालयात अनेक छोट्यामोठ्या दाखल्यांसाठी कार्यालयाचे उंबरठे मोलमजुरी टाकून झिजवावे लागतात. शाळकरी मुलांची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळ काढावा लागतो इलेक्ट्रिक बिल असो वा पाण्याचे बिल असो स्वतः उपस्थित राहून कामे पूर्ण करावी लागतात परंतु आता पातूर वासियांच्या सेवेत जनसेवक सचिन ढोणे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या समाधान सेतू या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून विनामोबदला काम करून देण्याचा संकल्प सचिन ढोणे यांनी केला आहे. त्यामुळे विविध प्रकारची कामे आता एकाच सेतू केंद्रा वरून होणार असून सामान्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून हर्षल ढोणे, अभिजीत करंगाळे हे या सेतू केंद्राची धुरा सांभाळणार आहेत गरजूंनी सकाळी आठ ते दहा व सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आपली कामे सेतू कार्यालयात आणून द्यावी व सदर उपक्रमाला प्रतिसाद देऊन आपला वेळ व पैसा वाचवावा असे आवाहन जनसेवक सचिन ढोणे यांनी केले आहे. सदर सेतू केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी तुकारामजी ढोणे, न प सदस्य तथा गटनेते हाजी सै.बुऱ्हाण सै.नबी, महादेवराव बोळे, माजी न.प उपाध्यक्ष मुजाहिद इक्बाल, भाजपा नेते राजूभाऊ उगले, न.प सदस्य सै.मुजम्मिल, महेंद्र ढोणे,राजू इंगळे,नवीन करंगाळे, गणेश हाडके, गजानन तायडे डॉ. नवीनचंद्र देवकर, शामराव भगत आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.