नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलीस विभागास सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार काळबांधे यांनी केले.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/वैरागड : – महाराष्ट्र राज्यात क्रांतिवीर बाबुराव शेडमके यांच्या स्मूतीप्रित्यर्थ दि.२१ ऑक्टो. रोजी शहिद दिवस पाळला जात आहे.नक्षलवाद्यांशी लढतांना आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील शहीद झालेले पोलीस शिपाई कोमल जनार्धन भाणारकर यांना आरमोरी पोलीस विभाग आणि गावातील नागरिकांनी आदरांजली वाहिली.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहल्ला) रहिवाशी असलेला कोमल भाणारकर बारावी नंतर पोलीस विभागात नौकरीला लागला. एटापल्ली येथील जांबिया गट्टा जंगल परिसरात नक्षल चकमकीत दि. ०२ जुलै २००४ रोजी कोमल शहिद झाला. शहिद दिनानिमित्त त्याच्या स्मृती प्रित्यर्थ आरमोरी येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांधे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शेडमाके, पोलीस नायक वसंत जौजाळकर, पोलीस शिपाई अतुल चौराहे, देवराव केळझरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, वडील जनार्धन भाणारकर, ग्राम पंचायत सरपंच संगिता पेंदाम, उप सरपंच भास्कर बोडणे, ग्राम पंचायत सदस्य सत्यदास आत्राम, विलास तागडे, आदेश आकरे, संगिता मेश्राम, रेखा भैसारे, रुपाली ढेंगरे, पोलीस पाटील गोरखनाथ भाणारकर, माजी ग्राम पंचायत सदस्य डोनु कांबळे, तसेच गावातील नागरीक बसस्थानक जवळील कोमल भाणारकर यांच्या शहीद स्मारकात असलेल्या प्रतिमेस पुष्पमाला, द्वीप प्रज्वलन आणि पंचशील घेऊन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार काळबांधे यांनी आदरांजली वाहतांना उपस्थित नागरिकांना सांगितले की, शहीद कोमल भाणारकर नक्षलवाद्यांशी लढतांना आपले प्राण प्रणाला लावले. त्यांनी आपले प्राण देऊन अनेक पोलिसांचे जीव वाचविले अशा शूर विरास शतशः प्रणाम. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलीस विभागास सहकार्य करा असे आवाहन यावेळी ठाणेदार मनोज काळबांधे यांनी केले.