समाधान पाटील तालुका प्रतिनिधी चिखली.
चिखली येथील प्राध्यापक तंजिम हुसेन यानी शिक्षण, विधी, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्र मागील 10 वर्षा पासुन आपले येगदान देत आहे,यावर जळगाव खान्देश येथील आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्याची घोषणा एका पत्राद्वारे केली.
चिखली येथील प्राध्यापक तंजिम हुसेन यानी मागील 10 वर्षापासून विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रिक मीडिया मध्ये काम केले यावर त्याच्या कामाची दखल घेत जळगाव खान्देश येथील आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेने त्यांनी मानाचा असा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर केला आहे, हा पुरस्कार यांना जळगाव खान्देश येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे त्यांना पुरस्कार जाहीर होताच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.