अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : सृष्टी बहुउउद्देशीय संस्था व राज्य युवा मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीने वक्तृत्व क्षेत्रासाठी देण्यात येणारा राज्य ‘युथ आयकॉन २०२१’ पुरस्कार राष्ट्रीय युवा वक्ते, महाराष्ट्राचा लोकप्रिय वक्ता पुरस्कार प्राप्त तसेच साथ सेवक फाउंडेशन चे साथीदार अक्षय भाऊराव राऊत यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण १७ ऑक्टोबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे होणाऱ्या पाचव्या युवा मराठी साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.अक्षय राऊत यांनी वक्तृत्वाच्या क्षेत्रात महाविद्यालयीन जीवनामध्येच आपल्या आवाज आणि भाषण कौशल्याच्या बळावर राष्ट्रांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शिक्षण घेतांना शेकडो वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धांचे पारितोषिके पटकावले आहे.महाराष्ट्राचा मोस्ट पॉप्युलर स्पीकर २०१९ या नामांकित पुरस्कारावर अक्षय राऊत यांना आपले नाव कोरण्यात यश मिळाले. नेहरू युवा केंद्र आयोजित भाषण स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दिल्ली येथे या बुलंद आवाजाने महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा मोठ्या डौलाने फडकविला. विद्याभूषण पुरस्कार, व्ही एस पी उत्कृष्ठ वक्ता पुरस्कार, गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा Youth achievement award, आदर्श युवक पुरस्कार, Times of india, maharashtra times,& Federal bank चा Speak for india 2019 MAHARASHTRA’S MOST POPULAR SPEAKER AWARD. अशा अनेक पुरस्कार मिळाले आहे. वक्तृत्व, वादविवाद, नाट्य, कला, खेळ अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांमध्ये यश संपादन करून आता नवीन वक्ते, कलाकार तयार व्हावे या उद्देशाने साथ सेवक फाउंडेशन च्या माध्यमातून भाषण-संभाषण कौशल्य विकास वाढीसाठी कार्य करत आहे. सामाजिक, कृषी, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात साथीदारांना सोबत घेऊन राष्ट्रनिर्मितीसाठी सकारात्मक, विकासात्मक, प्रेरणादायी प्रबोधनातुन उल्लेखनीय कार्य करीत आहे. या कार्याची दखल घेत अक्षय राऊत यांना जाहीर झालेल्या युथ आयकॉन पुरस्कारासाठी सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.


