जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर दि.१५ ऑक्टोबर २०२१
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांच्या लेखनामधून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम केले जाईल अशी भावना महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ.संजय गवई यांनी व्यक्त केली. श्री गुरु गणेश ग्रंथालय, लातूर द्वारा आज ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता यामध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष पुखराज दर्डा, सचिव राजेश डुंगरवाल, सुमतीलाल छाजेड, शरद डुंगरवाल, नरेंद्र गटागट व चोपडा साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा.डॉ.संजय गवई म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शाळेतील तिसऱ्या येथे पुढील प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन प्रेरणा दिन इयत्ता ३रीच्या पूढील विद्यार्थ्यांनी किमान १० छोटी पुस्तके (१६पानी) वाचावी. मुलांना वाचन, वाचनाची गती व वाचनाची सवय लागावी त्यामुळे दरवर्षी राज्यातील शाळांमध्ये 20 कोटी पुस्तके वाचले जातील. सध्या राज्यामध्ये २.२५ कोटी मुले शाळेत आहेत त्यातील १.८५ कोटी मुले इयत्ता तिसरी ते आठवी वर्गात आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये या पुस्तकांचं वाचन होईल आणि वाचन संस्कृती अधिक प्रगल्भ होईल असेही ते यावेळी म्हणाले.


