द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहुउद्देशीय संस्था व साथ सेवक फाउंडेशन यांचा स्तुत्य उपक्रम
किरण कुमार निमकंडे / अकोला
पातूर : येथील सामाजिक ,संस्कृतीक व शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहुउद्देशीय संस्था व साथ सेवक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भव्य जिल्हास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होतेे.याच स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष पातुरचे तहसीलदार माननीय दीपक बाजड होते,तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पातुरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार हरीश गवळी, शेतकरी नेते प्रशांत गावंडे ,साथ सेवक फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय राऊत, बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, वसंतराव नाईक काॅलेजचे प्राध्यापक शंकर गाडगे,एज्युविला स्कूलचे संचालक निलेश गाडगे, युवाश्री विशाल राखोंडे , प्रकाश देशमुख,रामानंद भवाने ,पत्रकार देवानंद गहिले, साथ सेवक अजय कवडे, पत्रकार अविनाश पोहरे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात थोर व्यक्तींच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे स्वागत मान्यवरांना थोर महापुरुषांची पुस्तक भेट देऊन व पुष्पगुच्छ करण्यात आले. यानंतर प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संचालक पंकज पोहरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. तदनंतर उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.यानंतर विविध स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले,तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देण्यात आले. जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली कु. प्रतीक्षा सुभाष भांगे, तसेच कु.स्नेहल रवींद्र बगाडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. ओम जगन्नाथ बोचरे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.तर निबंध स्पर्धे मध्ये कु.खुशी तेजराव इंगळे प्रथम क्रमांक, कु.सानिका श्रीकृष्ण झोडपे द्वितीय क्रमांक, कु. पायल विलास शिरसाट तृतीय क्रमांक, जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये अकोल्याची कु.आयुषी महोकार प्रथम क्रमांक, कु. खुशी तेजराव इंगळे द्वितीय क्रमांक, कु.शारदा नाकट तृतीय क्रमांक तसेच जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेमध्ये अकोल्याची कु.योगिता एकनाथ गवळी हीने प्रथम क्रमांक, कु. खुशी तेजराव इंगळे द्वितीय क्रमांक, कु. महिमा अशोक वानखडे तृतीय क्रमांक प्राप्त केला.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मेडल,व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सागर सैय्यद यांनी केले, तसेच मान्यवरांचे आभार अजय कवडे यांनी मानले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य मंगल डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भाऊ बोंबटकार, ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान सलीम खान यांचे सौजन्य लाभले. तसेच अजय बोरकर , अजय सुरवाडे ,अजय शिरसाठ, अमोल करवते, महावीर अवचार, आशिष दाभाडे, तसेच सर्व साथ सेवक टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी द प्रोफेशनल करिअर अकॅडमी सदैव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास तत्पर असते, तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सदैव स्पर्धेचे आयोजन करत असते. द प्रोफेशनल करिअर अकॅडमीच्या या अभिनव उपक्रमाबद्दल या संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.