सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/गुड्डीगुडम-: अहेरी तालुक्यातील रेपणपल्ली बिटा अंतर्गत येणारे गुड्डीगुडम येथील शेत शिवारात बिबटयाने बैलावर हल्ला केल्याने बैल जागीच ठार झाले आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.बिबट्याने जागीच ठार केलेले बैल गुड्डीगुडम येथील बाजीराव बोन्दा आत्राम यांची स्वमालकीचे बैल असून त्यांची घरची परिस्थीती अत्यंत बिकट अवस्थेची असल्यामुळे त्यांना दुःखाचे डोंगर कोसळले आहे. गुड्डीगुडम शेत शिवारात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक बैलावर हल्ला करून जागीत ठार केले.ही बाब जवळपासच्या शेतकरिना माहीत होताच बिबट्याच्या दिंशेने आरडाओरड केल्याने बिबट्या पसार झाला.सदर बिबट्याने गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात धुमाकुळ माजविला असुन या बिबट्याने परिसरातील अनेक बकऱ्यांचा जीव घेतलेला आहे.या परिसरात बिबट्याने धुमाकूळ केला असून याची माहीती नागरिकांनी पुर्वीच वन विभागाला देऊन सुद्धा कोणतेही उपाययोजना करण्यात आलेले नाही.तरी त्वरीत बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावे.बैल मालकास भरपाई देण्यात यावी.अशी मागणी परिसरातील नागरिकाकडुन केली जात आहे.