सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/पेरमिली : अहेरी तालुक्यातील पाेलीस उप मुख्यालय पासुन 30 किमी अंतरावरील अालापल्ली-भामरागड च्या मुख्य मार्गावर असलेले पेरमिली या ठिकाणी चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण अाहे.परिसरातुन पेरमिली ही बाजारपेठाच्या द्रुष्टीकोनातुन मोठी वस्ती अाहे.या ठिकाणी अनेक बँक, कार्यालये,दुकाऩे,पानठेले व हाँटेल इत्यादी आहेत.येथे नेहमी परिसरातील नागरिकांची वर्दळ राहत असते.पेरमिली येथे स्वमालकीचे ट्रँक्टर,दुचाकी व चारचाकी वाहने अनेकांकडे आहेत.ही वाहने राञीच्या वेळेत आपआपल्या घरासमोर उभी केली जातात.याचाच फायदा काही चोरी करणारे घेत आहेत.बाहेर असलेले सामान किंवा उभे असलेल्या वाहनांचे वस्तु काडुन लंपास केले जात असल्याचे अनेक प्रकरण घडत आहेत.तसेच राञीचे वेळेस अनेक नागरिक घराबाहेर किंवा घराबाजुला असलेल्या गोठ्यात जनावरे साठवितात तर घरासमोरिल झाडावर किंवा छपरीवर राञीच्या वेळेस काेंबडे राहतात.राञीच्या वेळेत नागरिक निवांत झोपेत असतांना चोराकडुन बक-या व कोंबड्यावर ताव मारले जात आहे. पोळ्याच्या सणाच्या दिवशी राञी चोरांनी तब्बल एकाच राञी गावातील 40 कोंबड्यावर ताव मारत लंपास केले होते.त्यावेळी कोणीही पोलीसा कडे तक्रार केली नाही.त्यामुळे चोरी करण्याच्या हिमतीत वाढ झाली असुन पेरमिली येथे चार दिवसापुर्वी महसुल मंडळातील निवासस्थानातील रुम मधील ताला फोडुन इलेक्ट्रीक वायर व इतर साहीत्य लंपास केले.याची तक्रार पेरमिली पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.काही वर्षापुर्वी गावातील काही अल्पवयीन मुलांनी गावातील दुकानांची घरफोडी केली होती.त्यावेळी पेरमिली पोलीसांनी या मुलांवर कारवाई केली होती.त्यावेळी चोरीचे प्रमाण कमी झाले होते. काही वर्षानंतर आता चाेरट्यांनी पुन्हा डोके वर काडले असुन राञीच्या वेळेस गावातील मोठ-मोठे सामानवर हात मारत आहेत.यात सुद्धा अल्पवयीन मुलांसोबत इतर कोणी मोठे व्यक्ती गुंतले आहेत का? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.आता पेरमिली पोलीस प्रशासना समोर चोरीच्या आरोपीचा छळा लावण्यास मोठे आव्हान निर्माण झाले आहे.