किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधीअकोला
अकोला : जिल्ह्यातील पातूर नानासाहेब हे ऋषी पाराशर यांच्या वास्तव्याने पावन असलेले एक पुरातन कालीन शहर , या शहराला निसर्गाने दिलेली इतिहासिक देणं घेणं म्हणजे सुवर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे तर चौबाजुनी हिरव्यागार डोंगर रागांनी वेढलेले आहे.येथील आदिशक्ती रेणुका माता मंदिर हे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध विदर्भातील भाविकांची मांदियाळी असते,तर भक्त दर्शनाची ओढ लावत आपल्या मनोकामना घेऊन रेणुका मातेच्या चरणी भाविक तल्लीन होतात, मातेचे मंदिर हिरव्यागार टेकडीवर वसलेले येथे मातेचे वास्तव्य आहे, टेकडीच्या पायऱ्या चढताना नवरात्र उत्सवात सुर्य उदयतेला मातेच्या आरतीला भावीक भक्त धाव घेतात.वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते, नवरात्रीच्या उत्सव नऊ दिवस सकाळी व सायंकाळी महा आरती होते, दरम्यान अतिशय संगीतमय मधुर स्वरांनी आपल्याला ऐकावयास मिळते.येथील दसरा उत्सव भाविक पेटलेल्या पोतबदी घेऊन ढोल ताशाच्या तालात शहरातील मुख्य मार्गावरून काढून भक्त आनंद उत्सव साजरा करून उत्साहात आनंदाने साजरा केल्या जातो.दसऱ्याच्या सणाला पातुर शहराच्या लेकी माहेरी येऊन कुलस्वामिनीचे दर्शनासाठी येतात. उत्तरेकडे पुरातन काळातील नानासाहेब वाडा आजही इतिहासाची साक्ष आहे,, तर टेकडीच्या दक्षिण दिशेला पुरातन अशी पांडवकालीन लेणी , शाहबाबू दर्गा , आई तुळजाभवानी पुरातन मंदिर, तर पातुर शहरापासून हाकेच्या अंतरावर अंतरावर बुद्ध विहार अशा सर्वधर्मीय देवस्थानचे आपल्याला दर्शन घडते.


