गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- आपण या समाजाचे घटक आहोत, माणसा तुझ्या माणसाला सांभाड तु हे ब्रिदवाक्य लक्षात ठेवुन आधारपर्व फाउंडेशनच्या माध्यमातुन सर्व ग्रुप सदस्यांच्या अनमोल मदत सहकार्याने तेल्हारा शहरातील मिलिंद नगर भागातील दिव्यांग बांधव योगेश अंभोरे यास एका महिण्याचा किराणा किट देऊन व त्यांच्या आईला नवराञ निमित्त साडी भेट देऊन सन्मान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला व मदत करतांना त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघुन मनाला समाधान मिळते व फाउंडेशन अंतर्गत गरीब गरजु,अपंग,निराधार यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा पुर्ण प्रयत्न आम्ही करतो आहोत असे आधारपर्व फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा गढे यांनी सांगीतले या सेवाकार्यात मदतीचा हात देणारे सेवक सुनीता ताथोड,वर्षा पारसकर,नरेंद्र शर्मा,सुरज चिकटे,श्रीकांत साबळे,वैशाली जाधव,नीता वायकोळे,Rk भैया,भाग्यश्री मोरे,भागवत देशमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.प्रत्येक माणसाने आपल्या परीने आपल्याला गरीब घरातील कुटुंबासाठी मदत करायची ईच्छा असल्यास आधारपर्वच्या मदतकार्यात सहभाग नोंदवावा असे मुख्य कार्यकारी अमोल बावस्कार यांनी कळविले.