किरण कुमार निमकंडे / अकोला
पातूर : दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी पातुर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयामध्ये पर्सिस्ट चॅम्प्स अबॅकस च्या वतीने राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष पातुर चे तहसीलदार दीपक बाजड होते तर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य मनीषा अजय ढोणे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून जी चॅम्प्स अबॅकस औरंगाबादचे संचालक योगेश देशमाने व आरती देशमाने यांनी उपस्थिती दर्शवली प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले सुप्रसिद्ध कवयत्री एडवोकेट विषाखा बोरकर, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सपना म्हैसणे, सुनील राखोंडे,देशमुख मॅडम मेडशी नगरसेवक राजू भाऊ उगले , अमोल भुस्कुटे, अविनाश पोहरे , श्रीकृष्ण शेगोकार सर आदींची उपस्थिती होती.प्रमुख सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार ट्रेकर्सच्या स्थानिक पातळीतील संचालिका कु. तेजस्विनी ढोणे यांनी केले
त्यानंतर राज्यस्तरीय बक्षीस वितरण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली त्यामध्ये कार्यक्रमांमधील मुलांनी कॅलक्युलेटर पेक्षा ही जलद गतीने आकडेमोड कशी करतात याचा डेमो दिला या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम रँक घेणारे विद्यार्थी गौरी दत्ता इंगळे, सुहानी संजय काळे, अर्पित अमोल भुस्कुटे, सेजल नितीन राऊत, कल्याणी विलास वडकुटे, रोहित सुनील खिल्लारे, रोहित विनोद इंगळे आदींना तहसीलदार दीपक बाजड योगेश देशमाने यांनी ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट देऊन सत्कार केला सेकंड रँक विद्यार्थी स्वरा सुनील राखोंडे ,समिक्षा सूनील खिल्लारे, कल्याणी संतोष निमकंडे, गायत्री चिंचोलकर , अनुष्का माकोडे, नरेश राऊत , उपस्थित मान्यवरांनी यांचासुद्धा सत्कार समारंभ केला आहे तसेच विद्यार्थी सानवी पाटील ,पार्थ बारबुदे ,सृष्टी अभंगे, अर्णवी उगले, सिद्धी पाकदुणे यांना देऊन गौरविण्यात आले आहे.यावेळी विविध स्पर्धाचे आयोजन केले होते.पालकांसाठी ब्लो माईंड ,पिरॅमिड बिल्डिंग या खेळाचे आयोजन केले होते त्या मध्ये ब्लो माईंड स्पर्धा विजेते पालक दुर्गा अनिल बारबुदे,प्रिती अमोल भुस्कुटे , कांचन ज्ञानदेव चिंचोलकर, अरुणा अभंगे , शारदा नितीन राऊत ,मंगला विनोद इंगळे सौ सविता अमोल माकोडे, सौ मंगला दत्ता इंगळे ,शितल राहुल नाकट , वैशाली विलास वाडकुटे, प्रणाली सुदेश पाकदूने ,कांचन ज्ञानदेव चिंचोलकर, यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच पिरॅमिड बिल्डिंग गेम मध्ये अनिल बारबुदे , ज्ञानदेव चिंचोलकर,अमोल भुस्कुटे आदी विजेत्या पालकांना बक्षिस देउन गौरविण्यात आले मुलांनी गायन आणि नृत्य सादर केले.या कार्यक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पातुर चे तहसीलदार दिपक बाजड, योगेश देशमाने,आरती देशमाने मॅडम यांनी यावेळी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रितेश सौंडळे गुरुजी यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पर्सिस्ट जी चॅम्प अबॅकस पातुर शाखेच्या संचालिका तेजस्विनी ढोणे यांनी केले.