शेतात अहोरात्र कष्ट उपसून अन्न-धान्य पिकविणारी जगाची पोशिंदा आहेस तू…
शिक्षणासाठी हालअपेष्टा सोसुन स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणारी क्रांतीज्योती सावित्री आहेस तू..
अन्यायाविरुद्ध पेटुन उठणारी समाजात क्रांती घडवणारी धगधगती मशाल आहेस तू…
प्रत्येक क्षेत्रात आपल्या शौर्याचा ठसा उमटवुन वेगळा इतिहास रचणारी वीरांगना आहेस तू…
दृष्टप्रवृत्तीचा विनाश करुन समाजात शांतीचा संदेश प्रस्थापित करणारी नवदुर्गा आहेस तू..
प्रा. शंकर तू. गाडगे
वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर