आत्महत्या पेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे आरोप …
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा – तालुक्यातील येणारा इंदिरानगर गावाचे आदीवासी शेतकरी सतीश सल्लम, पेंटीपाका चेक हद्दीतील येणारा शेतपरिसरात गेल्या अनेक वर्षेंपासून कापसाच्या पीक लावून उत्पादन काढतात. या वर्षी वनविभाग कोणतीही पूर्वसूचना ना देता शेतातील पीक उपडले, अन कारवाही करण्याची धमकी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा वाली कोण ?असा प्रश्नचिन्ह वनविभागाचा कारवाही वर निर्माण झाला आहे. आत्महत्या पेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
सतीश सल्लम हा शेतकरी आदिवासी बांधव असून त्यांना कुटुंब पालन पोषण करण्याचे कोणत्याही आधार नसल्याने, दर वर्षी प्रमाणे शेतपरिसरात कापसाचे पीक लावण्यात आले,त्यातून आजच्या दिवसात कापसाचे झाडे मोठी झाली होती. आणि पुढील एक महिन्यात शेतात कापूस पण काढनार होते, त्या गरीब आदिवासी शेतकरी यांनी या कापसाची उत्पादन काढण्यासाठी त्यामध्ये 1 लाख रुपये खर्च ही केले होते, एवढे झाल्यानंतर सिरोंचा वनविभागाचे अधिकारी कटकू यांनी त्या आदिवासी शेतकरी सतीश सल्लम यांना कोणत्याही नोटीस ना देता, त्यांनी केलेल्या कापसाच्या शेतात जाऊन मोठी झालेल्या कापसाचे झाडे तोडल्याने आदिवासी बांधव सतीश सल्लम यांचे मोठे नुकसान झाले आहे, या नुकसनातून सल्लम यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे, आधीच कोरोनामुळे हाताला काम नाही, त्यात विनविभागाचा कार्रवाहीमुळे त्या कुटुंबाना आत्महत्या शिवाय कोणत्याही उपाय नसल्याचे सांगण्यात येत आहे.











