अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगांव दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री दाहाल वजता अकोला वाशीम हायवेवर रोड वर रिधोरा गावात जवळ समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या धावत्या टिप्परला भीषण आग लागून टिप्पर घटनास्थळावर जळून खाक झाल्याची नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी राजुरा परिसरातून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात टिप्पर द्वारा गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे आज रात्री दहा वाजता दरम्यान टिप्पर राजुरा वरून रिधोरा कडे समृद्धी महामार्गाच्या कामावर जात असताना सुकांडा फाट्या नजीक धावत्या टिप्परला अचानक आग लागली सुदैवाने आगीची घटना वाहन चालकाच्या लक्षात येताच वाहन चालकाने तात्काळ वाहन बंद करून टिप्पर मधुन खाली उडी घेतल्याने कोणतीही जिवित हानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ जमादार शैलेश ठाकूर पोलिस नायक अमोल पाटील याच्या सह इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्य नंतर एकां तासाचे आत गाडी घटनास्थळी दाखल झाली मात्र तो पर्यंत टिप्पर पुर्णपणे जळून खाक झाले होते टिप्परचा नंबर सुध्दा ओळखला येत नव्हता आगेचे लोळ जवळपास दोन कि्मी अंतरा पर्यंत दिसत असल्याने अकोला – नांदेड मार्गावरून जाणारे इतर वाहनधारकांनी आगीची घटना बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती वृत्त लिहित असताना अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती व टिप्परची आग विझविण्याचे काम सुरू होते घटनास्थळावर महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते.