अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : येथिल सामाजिक कार्यकर्ते कालकथित समाधानजी बोरकर यांची मुलगी कवयित्री अँड. विशाखा समाधान बोरकर यांचा “बंदिस्त रूढीच्या विळख्यातून” हा मीरा प्रकाशन पुणे यांनी प्रकाशीत केलेला पहिला कवितासंग्रह “बंदिस्त रूढीच्या विळख्यातून”हा गो.ल. आपटे सभागृह डेक्कन जिमखाना पुणे येथे 03 अक्टूबर ला प्रकाशित झाला. स्व:ताचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत विविध क्षेत्रात यशस्वी झेप घेणारे मीरा प्रकाशनचे प्रकाशक मा. डॉ.संतोष पोटे यांनी अतिशय सुंदर असे नियोजन करुन साहित्य विश्वातील मान्यवरांचे हस्ते हा सोहळा पार पाडला. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यवसायाने वकील असलेल्या अँड. विशाखा समाधान बोरकर यांचा समाजातील विविध रूढी-परंपरांवर घणाघाती घाव घालणारा कवितासंग्रह हा स्त्रियांच्या सामाजिक परिस्थितीचे प्रातिनिधित्व करते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. संस्कृतीने नटलेल्या महाराष्ट्रामध्ये पहिला काव्यसंग्रह बंदिस्त रूढीच्या विळख्यातून आज समाजातील स्त्रियांच्या दयनीय परिस्थितीवर प्रकाशित करावा लागला ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.असे मा.वैराळकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ गझलकार सुरेशकुमार वैराळकर सर होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी सुतार ,हनुमंत चांदगुडे सर,रमा नाडगौडा मॅडम ,शशी डंभारे मॅडम, डॉ केसकर सर,डॉ विजय शिर्के सर,सुभाष गवारी सर , रवीन बोरा सर, अनुज शर्मा सर,ममता सिंधुताई सपकाळ ,सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे सर, दीपा देशमुख मॅडम ,सुगंधा सुहास शिरवळकर मॅडम, दिलीप लिमये सर आदि साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.आज वास्तव परिस्तितीवर लिखाणाची गरज आहे आणि साहितत्यातून समाज परिवर्तन होते तेव्हा अॅड. विशाखा बोरकर यांनी लिहिलेल्या सामाजिक विषयांवरिल कविता याची खर्या अर्थाने गरज आहे असे मत कवी बालाजी सुतार यांनी व्यक्त केले.यावेळी अनेक मान्यवरांनी काव्यसंग्रहातील कवितेचे वाचन केले. विशाखा वडील कालकथित समाधानजी बोरकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या लेखणीमधून पुढे नेत आहे, अल्पश्या वयात त्यांनी टाकलेले साहित्य क्षेत्रात पाऊल याचे सगळीकडे कौतुक होत आहे.उच्च शिक्षण घेत असणारी विशाखा ही नियमितपणे विविध वर्तमान पत्रातून सामाजिक विषयावर नियमिय लिखाण करते.

