गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची झालेल्या दयनीय अवस्थे बद्दल तेल्हारा बार असोसिएशनने रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत जिल्हाधिकारी अकोला यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन रस्त्यांची दुरुस्तीची मागणी केली मागणी मंजूर न झाल्यास १८ ऑक्टोंबर पासून तेल्हारा गाडेगाव रस्त्यावर साखळी उपोषण करण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला तसेच वेळप्रसंगी तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कायदेशीर लढा सुद्धा लळण्याचे तेल्हारा बार असोसिएशनने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तेल्हारा तालुक्यातील रस्ते अनेक वर्षापासून खोदून ठेवले आहेत परंतु पुढील कारवाई बंद झाली आहे त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्यांवरून दळणवळण करणे अशक्य झाले आहे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तेल्हारा तालुक्यातील बऱ्याच लोकांचे जीवघेणे अपघात झाले असून रस्त्याच्या धुळीमुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आले तसेच रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे तेल्हारा आगार तसेच इतर प्रवासी वाहतूक वाहनांनी दळणवळण बंद केले आहे त्यामुळे सुद्धा नागरिकांचे हाल होत आहेत विशेषत तेल्हारा गाडेगाव रस्त्यावर तालुक्यातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय व न्यायालय असून येथे रस्त्यांमुळे नागरिक तसेच पक्षकार यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे यापूर्वी सुद्धा तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यांबाबत विविध प्रकारचे आंदोलन केले आहे परंतु प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही अद्यापपावेतो रस्त्याचे काम चालू केले नाही रस्त्याच्या तालुक्यातील कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे तेल्हारा वकील संघाने ९ ऑक्टोंबर रोजी सभा आयोजित करून रस्त्यांबाबत चर्चा करून दिनांक १८ ऑक्टोबर पासून तेल्हारा गाडेगाव रोडवर साखळी उपोषण करण्याचे सर्वानुमते ठरविले आहे तसेच संबंधित विभाग ठेकेदार अधिकारी यांच्याविरुद्ध दिवाणी तसेच फौजदारी कारवाई करण्याचे सुद्धा ठरवले आहे अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असून वेळप्रसंगी मोठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तेल्हारा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे . यावेळी तेलारा बार असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य एड. श्रीकृष्ण रहाणे एड. नरेश चौधरी ,बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. विलास जवंजाळ, सचिव अतुल काकड, पवन शर्मा ,मनोज राठी, नासीर शेख, संदिप वानखड़े मनोज राठी ,अरुण कुकडे ,आशुतोष राहणे, तुषार जंजाळ, किशोर राऊत, गायगोळ ,रामेश्वर मनतकार ,अख्तर शहा ,अजय हागे ,गजानन तराळे, के. डी .गोरडे ,पी एस माडोकार ,आर जी कुलकर्णी , आर पी मंत्री इत्यादी तेल्हारा बार असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.











