अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : अकोला वन्यजीव विभाग,वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, इंडियन रेड क्रॉस सोसायटी , निसर्ग कट्टा व प्राणीशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय यांच्या वतीने 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यात रक्तदान शिबिर, आँनलाईन चित्रपट महोत्सव,काटेपूर्णा अभयारण्य किनारा मोहीम, विद्यार्थी अभ्यास दौरा,पक्ष्यांसाठी ज्युस ट्री वृक्षारोपण, वन्यजीव ओळख, रंगभरण स्पर्धा, वॉटसअप स्टेटस स्पर्धा असे उपक्रम राबविण्यात आले. वन्यजीव सप्ताहाचा समारोप शिक्षण प्रसारक मंडळ अकोला चे सचिव गोपाल खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय वनाधिकारी ए.डब्यु.निमजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी अतिथी म्हणून सहाय्यक वनसंरक्षक एच.पी पडगव्हाण, प्राचार्य जगदीश साबू, निसर्गकट्टाचे अध्यक्ष अजीम शेख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळेस वन्यजीव सप्ताहात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहीती निसर्गकट्टाचे संस्थापक श्री़ अमोल सावंत यांनी करून दिली . रक्तदान सप्ताहात मोलाचे सहकार्य करणारे इंडियन रेडक्रॉस सोसायटी अकोला शाखेचे मानद सचिव श्री. प्रभजितसिंह बछेर, मिलिंद शिरभाते, डॉ. हेडगेवार रक्तपेढी तसेच वन्यजीव सप्ताहा मोलाचे सहकार्य करणारे प्रा.संतोष सुरडकर, वनस्पती विभाग प्रमुख, गुलाबनभी महाविद्यालय डॉ. अमृता शिरभाते, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख , महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय, पातुर, श्री.संदिप सरडे, आधार फांऊडेशन, प्रा.धम्मपाल भदे, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख, बुरंगले महाविद्यालय, शेगांव व वनक्षेत्र अधिकारी पवन जाधव, निलेश कुरवाडे व काटेपुर्णा अभयारण्य कर्मचारी समूह, भावेश वाघमारे, सागर काकडे, यश देशमुख, प्रियाकुमारी धाबे, गाईड नागेश वाकोडे, जान्हवी गायकवाड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ए.डब्यु.निमजे यांनी अभयारण्य, जंगलाची व्याप्ती व गरज, झाडांचे महत्त्व, वन्यजीव विभागाचे विविध उपक्रम व जनजागृती याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपवनसंरक्षक पडगव्हाणकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे औचित्य, वन्यजीवाचे महत्त्व, वनाची गरज यावर मार्गदर्शन केले. मा.गोपाल खंडेलवाल यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन करताना पर्यावरण जागृतीची देशाला असणारी गरज व संरक्षण
याची गरज प्रतिपादन केली. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद शिरभाते यांनी तर आभार डॉ.प्रिया धाबे यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.कार्यक्रमाला अमोल सावंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रोहन शिरसाट,प्रा. नितीन सुरडकर, गणेश उपाध्याय यांनी परिश्रम घेतले.











