आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, देसाईगंज व कुरखेडा तालुक्यात रब्बी हंगाम-२०२१ मार्च, एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान होऊन येथील शेतक-यांना जबर फटका बसला होता.ही वस्तुस्थिती लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी झालेल्या अतोनात नुकसानीची भरपाई मिळावी याकरिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून मागणी धरून लावल्याने अखेर या भागातील नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली असल्याने आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.प्राप्त माहितीनुसार आरमोरी विधानसभा क्षेञात झालेल्या प्रचंड नुकसानीची आमदार गजबे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून संबंधित अधिका-यांना तात्काळ मोका चौकशी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिका-यांनी नुकसानग्रस्त रब्बी पिकाचे मोका चौकशी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला होता.नुकसानीचा अहवाल सादर करुन समस्या अवगत करुन देण्यात आली असतानाही नुकसान भरपाई देण्यात येत नसल्याने अखेर आमदार गजबे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंञी विजय वडेट्टीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या अवगत करुन दिली.यावेळी वडेट्टीवार यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेता नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाईपोटी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करुन १ कोटी ३९ लक्ष रुपयाच्या निधीस मंजुरी प्रदान करुन सदरची रक्कम तत्काळ नुकसानग्रस्त शेतक-यांच्या थेट बॅक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे येथील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहुन वारंवार पाठपुरावा केल्यानेच अखेर नुकसान भरपाई मिळवुन देण्याचा मार्ग मोकळा करुन देण्यात आल्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतक-यांनी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार व्यक्त केले आहे.











