दोन दिवसीय शिबीराचे आयोजन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/पेरमिली-: गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसर हा अत्यंत आदिवासी बहुल व नक्षल प्रभावित क्षेञ आहे.या परिसरातील अनेक गावे अति दुर्गम भागात आहेत.येथील नागरिक मुलभुत हक्कापासुन सदैव वंचीत आहेत.अशा नागरिकांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी व त्याचा सामाजीक व सर्वांगिन विकास घडवुन आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल व पेरमिली उप पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नेहमी तत्पर आहेत.या परिसरातील नागरिकांना इतर कागदपञाकरिता तालुक्याच्या ठिकाणी गाठण्याकरिता 40 ते 50 किमी अंतर पार करून काम करावे लागते.काम न झाल्यास दोन दोन दिवस मुक्काम सुद्धा करावे लागते.त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागत आहे.पेरमिली पोलीसांनी या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अनुज तारे, समीर शेख,यांच्या संकल्पनेतून तसेच अहेरीचे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोस्टे पेरमिली येथे पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड व इतर शासकीय योजनेबाबत दिनांक 5/10/021 ते 6/10/021 रोजी सलग दोन दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले.या दोन दिवसीय शिबीरा मध्ये परिसरातील 400 ते 500 नागरिक उपस्थित होते. सदर शिबिरात अनेक जणांचे नविन आधार कार्ड व नुतनिकरण करण्यात आले.तसेच आयुष्मान भारत कार्ड 104 जणांनी तर संजय गांधी निराधार योजनेचा अनेकांनी लाभ घेतला.सदर शिबीर दरम्यान उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. शिबिराला अतिदुर्गम भाग असलेल्या बोडामेठा, ताडगुडा, चौडमपली,पल्ले, मिरकल,चंद्रा टोला, तुमरकसा, कोरेली, अारेंदा, येरमणार, अालदांडी, वेडमपल्ली,रापेली,चंद्रा,अशा एकूण 28 गावातील नागरिकांची उपस्थिती होती. सर्वांनी अतिदुर्गम भागात शिबीर आयोजित केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता पोलीस उपनिरिक्षक धवल देशमुख, गंगाधर जाधव, धनंजय पाटील,सडवली पडालवार,सुमित कवटलवार, संकेत फुलजले,नोबल रालबंडीवार व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.जिल्हा पोलिस व सिआरपीएफ चे अमलदारांनी परिश्रम घेतले.











