गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- तालुक्यातील रस्ते बांधकाम करीत असलेल्या कंपनीच्या मालकांकडून मजूर व कामावर साहित्य पुरविणाऱ्या तीन व्यक्तींना वारंवार मागणी करून सुद्धा कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे 2 ऑक्टोंबर ला तीन व्यक्ती तालुक्यातील तिर्थक्षेत्र वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमावर जलसमाधी घेण्या करता शेतातुन आडमार्गाने नदीकडे येत असल्याचा ठाणेदारांना सुगावा लागताच ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी सापळा रचून जलसमाधी घेणाऱ्यांना रोखल्या मुळे पुढील अनर्थ टळला.तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामावर मजुरी करण्याकरिता तसेच रस्त्याच्या कामाकरिता लागलेले साहित्य पूरविन्या करिता सुधीर कंट्रक्शन ई. प्रायव्हेट लिमिटेड नागपूर , (गो अहेड इन्फ्रा नागपुर, राजलक्ष्मी एंटरप्राइजेस , विष्णू एंटरप्राइजेस) या कंपनीकडे प्रवीण विजय तायडे ,मनीष माणिकराव फसाले व आकाश गजानन निवाने हे तीन व्यक्ती या कंपनी कडे मजूर म्हणून काम करीत होती यामधील काहीजण रस्त्याच्या कामाकरिता लागलेले साहित्य पुरविण्याचे काम करीत होते परंतु या सदरहू कंपनीकडून वारंवार मागणी करून सुद्धा त्यांना केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नाही याकरिता अन्यायग्रस्त व्यक्तींनी ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा तहसीलदार तेल्हारा सार्वजनिक बांधकाम विभाग तथा रस्ते बांधकाम करीत असलेल्या कंपनीच्या मालकाला थकीत असलेल्या मजुरीच्या व केलेल्या कामाच्या पैशाबाबत खोटे चेक देऊन फसवणूक करीत असल्याचे पत्राद्वारे माहिती दिली होती परंतु या पत्रव्यवहारावर उल्लेखित कुठलेही कार्यालयाने संपर्क करून अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे कोरोना काळात काम केले असूनही कामाचे पैसे न मिळाल्याने आमच्यावर आमच्या परिवारावर आत्महत्येची पाळी आली आहे त्यामुळे सदर कंपनीवर कार्यवाही करून आम्हाला त्वरित न्याय मिळवून न दिल्यास व कामाचा मोबदला न मिळाल्यास शासन व इतर यंत्रणा आम्हाला जलसमाधी घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत असे गृहीत धरून निवेदन दिलेल्या दहाव्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबर ला ठरल्या प्रमाणे दुपारी एक वाजताच्या सुमारास त्रिवेणी संगम तीर्थक्षेत्र वांगेश्वर येथे .प्रवीण तायडे , मनीष फसाले ,आकाश निवाने शेतामधून आडमार्गाने नदी कड़े येत असल्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या लक्षात येताच .त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सावध करून जलसमाधी घेन्या करिता येणाऱ्यांना त्रिवेणी संगमाच्या नदीकाठावर रोखून त्यांना ताब्यात घेतले. व पोलीस स्टेशन मध्ये आणून डिटेंड करून नंतर सोडून देण्यात आले.पोलीस प्रशासना व्यतिरिक्त कोणीही घेतली नाही दखल.अन्यायग्रस्त तीन व्यक्ती 2 ऑक्टोंबर ला त्रिवेणी संगमावर जलसमाधी घेणार असल्याचे आधीच माहीत असल्यामुळे तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड आपल्या सहकाऱ्यांसह सकाळपासूनच वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमावर तळ ठोकून बसले होते .व शेतातून आडमार्गाने येत असलेल्या तीन व्यक्तींना नदीकाठी रोखून पुढील होणारा अनर्थ टाळला. यावेळी पोलीस प्रशासना व्यतिरिक्त शासनाच्या इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. हे दिसून आले .
जलसमाधी घेण्याकरिता ठाम होतो .परंतु पोलिस प्रशासनाने जलसमाधी घेऊ न देता रोखले. परंतु पुढे याकरिता संबंधित कंपनी व प्रशासनाने आमच्या मागणीची कुठलीही दखल न घेतलेल्यास .जिल्हाधिकारी व शासना कड़े इच्छा मरणाची मागणी करून पुढे काय करायचे ते ठरवू .
मनीष फसाले , तेल्हारा











