पवनसिंग तोडावत
ग्रामिण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.02 :अंधानेर ग्रामपंचायत मध्ये सरपंच अशोकराव दाबके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शेतकऱ्यांना डिजिटल सातबाऱ्याचं मोफत वाटप करण्यात आले व स्वच्छ भारत मिशनची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देऊन आपलं अंधानेर गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी अंधानेर गावचे सरपंच अशोकराव दाबके, ग्रामविकास अधिकारी एम.डब्ल्यू.पगारे ,तलाठी चव्हाण आप्पा ,मुख्याध्यापक वनारसे,उपसरपंच रशीद शेख ग्रामपंचायत सदस्य कैलास मालकर,संजय पांडे, सतीश काळे ,बाळू वाघ, मनोज बागले,व ग्रामस्थ श्याम जाधव ,गोरख करवंदे, कारभारी नेवगे ,गणपत वाघ, अशोक नेवगे, संतोष जाधव, शेषराव मालकर,फकीरराव नेवगे,बचतगट महासंघाचे अध्यक्ष प्रतिभा मालकर,सी आर पी ज्योती पंडित ,मीरा पंडित, कविता रोकडे व आदी ग्रामस्थ व ग्रा.पं.कर्मचारी सर्वांनी गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या आनंदात उत्साहात साजरी केली.