अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
स्थानिक: अकोला राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. परीक्षा अचानक पणे तांत्रिक कारण सांगून रात्री 11. 40 वाजता रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी निराशा झाली आहे, ऐनवेळेवर रद्द करण्याच्या या निर्णयाने आज होणाऱ्या परीक्षेसाठी बाहेरगावी परीक्षा केंद्रावर पोहचल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काही परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत. सदर परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. “एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना अदापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही. असा सगळा प्रकार उघडकीस येताच आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या प्रती बेजबाबदार असल्याचे दिसून येते.म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनाची ही मागणी आहे की परीक्षार्थी यांचे प्रवास खर्च परत करण्यात यावे, परिक्षार्थीना परीक्षा केंद्रावर जाण्याकरीता मोफत प्रवास करण्यासाठी रेल्वे आणि बस पास सरकारने उपलब्ध करून द्यावे, स्थानिक व जवळील परीक्षा केंद्र देण्यात यावे, लवकर परीक्षेचे नियोजन करून तारीख जाहीर करावी. सोबतच रखडलेल्या इतर विभागाच्या परीक्षा घेण्यात याव्या. आणि विद्यार्थ्यांना झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून सदर प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. ही प्रमुख मागणी आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात यावी अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. तेव्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे हितेश जामनिक, राजकुमार दामोदर,धिरज इंगळे,आकाश गवई, विशाल नंदागवळी,अक्षय डोंगरे, राहुल बामणे,सागर दिसाळे, सोमेश दाभाडे ,दीपेश वानखडे,सुरेश अहिर,भूषण शिरसाठ,पियुष शिवधारकर, मनोज तायडे,सतीश गवई, नितीन इंगळे, सुरज दाभाडे, अजय बोरकर,आकाश चक्रे, पवन स गवई ,प्रशिक खंडारे,आर्यन मेंढे,अक्षय सरकटे, सुरज राऊत,संतोष वानखडे, अभिषेक हिरोळे,कुणाल शिरसाठ, अनिकेत इंगळे,रोहित शिरसाठ, सचिन वानखडे,देवा थाटे, अमर ढोकणे ,हर्षल तायडे, ऋषी तायडे,राहुल भगत ,प्रेम ओइंबे,अजय ओइंबे आदी विधार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.