जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर/संपूर्ण देशामध्ये लातूरने शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळविला आहे म्हणूनच लातूरला शैक्षणिक हब म्हणून सर्वत्र संबोधले जाते परंतु येणाऱ्या काळामध्ये लातूरला क्रीडा क्षेत्रातील हब बनविण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन लातूरचे खासदार सुधाकररावजी शृंगारे यांनी केले. नेहरू युवा केंद्र संघटन, युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा युवा समन्वयक कार्यालय, लातूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव इंडिया 75 निमित्त मेगा फिट इंडिया फ्रीडम रन” या कार्यक्रमाचे दि.25 सप्टेंबर 2021 रोजी स.10 वा. टाऊन हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जीवनभर शहरकर गुरुजी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बळीराम सोनटक्के, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, दयानंद महाविद्यालयाचे डॉ.दीपक नागरगोजे, जिल्हा युवा अधिकारी कु.साक्षी समैया, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती जाधव, जिल्हा युवा सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ.संजय गवई आणि संगमेश्वर जनगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा स्मृतीस्तंभाला सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले.पुढे बोलताना खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले की, लातूरची भूमी ही सर्वगुण संपन्न आहे. क्रीडासंबंधी सर्व सेवासुविधा या शहरी भागांमध्ये असतात मात्र त्या सर्व सेवासुविधा ग्रामीण भागामध्ये पोहोचविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे ते म्हणाले.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज म्हणाले की, covid-19 मुळे संपूर्ण देशामध्ये महामारीची स्थिती निर्माण झाली होती. सध्या हळूहळू समाज व्यवस्था पूर्वपदावर येत आहे. शाळा महाविद्यालय व इतर आस्थापना सुरू होण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने याठिकाणी आनंदामध्ये संपन्न होत आहे असे ते म्हणाले.यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, मानवी जीवनामध्ये खेळायला अनन् यसाधारण महत्त्व आहे. मी एक राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे त्यामुळे मला खेळाची मनापासून आवड आहे. आपण सर्व मेगा फिट इंडिया फ्रीडममध्ये आनंदाने सहभागी झाला त्याबद्दल मला आनंद वाटतो असे ते म्हणाले या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या स्वाती जाधव म्हणाल्या की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कार्यकर्त्याला सामाजिक जीवनामध्ये कार्याची योग्य दिशा मिळते आपल्या व्यक्तिमत्वाची सकारात्मक पद्धतीने जडणघडण या ठिकाणी होते त्यामुळे मी एक कार्यकर्ते म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमांमध्ये प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम भारत सरकारद्वारा मोठा हर्षोल्हासात साजरा केला जातो आहे याचा मला मनस्वी आनंद आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश हालींगे यांनी केले तर प्रास्ताविक कु.साक्षी समैया यांनी केले तर आभार डॅा.संजय गवई यांनी मानले. या कार्यक्रमांमध्ये अमोल स्वामी, अभिषेक, प्रवीण व चमूने झुंबा गीत सादर केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय ममदापूरे, अंकुश साळुंके सारंग कदम, गणेश कांबळे, उमेश गाडे, स्वप्निल माने व इतर सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. ही दौंड विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून खासदार सुधाकर शृंगारे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केली त्याचा समारोप जिल्हा क्रीडा संकुल येथील स्मृतिस्तंभ याठिकाणी करण्यात आला या दौडमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालय विद्यालयातील रासेयो स्वयंसेवक, क्रीडा विभागातील खेळाडू, दयानंद महाविद्यालय रासेयो स्वयंसेवक, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.


