अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
मोरगाव भाकरे : माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व आमदार गोवर्धनजी शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर सौ अर्चनाताई मसने , युवा नेते अनुपदादा धोत्रे, किशोर मांगटे पाटील, माधवराव मानकर, जयंतराव मसने, सरचिटणीस संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, डॉक्टर विनोद बोर्डे , संजय जिरापुरे ,संजय गोटफोडे, पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड,यांच्या उपस्थितीत भाजपा पूर्व मंडळामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी आ श्री रणधीर भाऊ सावरकर यांनी भाजपा कार्यकर्ता ने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन चरित्राचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनी आयोजित बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या समक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनातून बोध घेऊन समाजाची सेवा करावी व पक्षाचे मूल्य आणि विचारांचे जतन करून जनसामान्यांपर्यंत पोहोचून पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदय चे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन आमदार सावरकर यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय समर्थ बूथ अभियानाच्या अंतर्गत सर्व बूथ प्रमुखांना बूथ समित्या पूर्ण करून व त्यांच्या बैठकीचे आयोजन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्देशानुसार करावे व पक्ष संघटना सर्वसमावेशक करून सर्व समाजाच्या लोकांना समाविष्ट करून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्याचे आवाहन महानगराचे अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी याप्रसंगी केले. अकोल्याच्या प्रथम नागरिक महापौर सौ अर्चना ताई मसने यांनी याप्रसंगी सर्व महिला नगरसेविका व पदाधिकारी यांना पक्षकार्या मध्ये समर्थपणे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व बूथ समितीमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती असल्याबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी तिडके स्पोर्ट्स चे संचालक सुशांत जी तिडके, व गजानन जी तिडके यांचा पूर्व मंडळाकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा नेते व उद्योजक अनुप दादा धोत्रे माधवराव मानकर ,जयंतराव मसने, शसंजय गोडा, संजयजी जिरापुरे अक्षय गंगाखेडकर, डॉक्टर विनोद बोर्डे ,संजय गोटफोडे, उकंडराव सोनोने , योगेश मानकर,निलेश भाऊ काकड, मोहन पारधी, अक्षय जोशी, केशव पोद्दार, नगरसेवक सौ गितांजली शेगोकार, हरीश काळे , सौ पल्लवी मोरे, सौ अनुराधा नावकार, मिलिंद राऊत, सौ रश्मीताई अवचार, सुभाष खंडारे, सौ सारिका जैस्वाल, राहुल देशमुख, सौ आरती घोगलिया, अजय शर्मा, सौ जान्हवी डोंगरे ,अनिल मुरूमकार सौ सुनीताताई अग्रवाल, ,पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे, आकाश ठाकरे, अभिजीत कडू ,पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशव हेडा, सागर शेगोकार, अनिल नावकार, प्रशांत अवचार, सौ निकिता देशमुख , सौ वर्षा गावंडे , अभिमन्यू नळकांडे ,संतोष भाऊ डोंगरे, रुपेश जयस्वाल, संदीप शेगोकार, कृष्णाजी तिडके, सुशांत तिडके, गजाननराव तिडके,अतुल अग्रवाल ,यश अग्रवाल, शिवम ठाकूर ,शुभम चंदन ,यांच्यासह भाजपा पूर्व मंडळातील बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.