गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : प्रखर विचारक उत्कृष्ट संगठनकर्ता एकात्मता मानववाद चे प्रणेते पं. दीनदयाल उपाध्याय जयंती च्या औतिंत्य साधुन दि 25 सप्टेंबर रोजी शहरातील प्रभाग क्र 6 मधिल संत रविदास समाज मंदिरात प्रधानमंत्री नरेद्र मोदी चे सेवा व समर्पण अभियान अंतर्गत स्थानिक महिला व पुरुषाचे कोव्हिड लसीकरण व प्रधानमंत्री जिवन ज्योती व प्रधान मंत्री सुरक्षा बिमा काढण्यात आला या अभियानाला स्थानिक नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमा च्या प्रारंभी भारत माता, संत रविदास महाराज,श्री शिवाजी महाराज, पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे हारअर्पण व पुजन जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड,तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार, शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका,नगर परिषद अध्यक्षा सौ जयश्रीताई पुंडकर,शेतकरी पँनल चे संदिप खारोडे,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा नयनाताई मनतकार, नगरसेवक नरेश आप्पा गंभिरे, सुनिल राठोड,नगरसेविका सौ नलिनि ताई तायडे, गणी शहा,सरचिटणीस रवि गाडोदिया, गजानन गायकवाड वैद्यकीय आघाडी चे डाँ राहुल सदाफळे,भाजयुमो शहरध्यक्ष गणेश इंगोले, अतुल विखे,बाळकृष्ण पवार,विजय देशमुख, सचिन तायडे,भवानी प्रताप मोहन भटकर,नागोराव वानखडे वैद्यकीय अधिक्षक डाँ अशोक तापडिया यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डाँ इंगळे, मोहरे मँडम बोरे मँडम ,सुनिल भुजबले,गोकुळ हिंगणकर,पंकज देशमुख, रवि शर्मा, शिवा खाडे, कपिल खोडे राकेश बोरसे ऋषभ ठाकुर,यासह भाजपा भाजयुमो शहर शेतकरी पँनल चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुळजाभवानी मंडळ,वैष्णवी मंडळ, जिजामाता मंडळ,मरिमाता मंडळ,न्यु भवानी मंडळ, सोमनाथ मंडळाचे कार्यकर्ते नी अथक परिश्रम घेतले.