गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- तेल्हारा नगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील नाव चुकलेले आहे, हे समजून सुद्धा सदर चूक दुरुस्त न करण्याचा हेकेखोरपणा पालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांकडून केल्या जात असल्यामुळे पालिकेने कायम महापुरुषांचा अवमान करण्याचे ठरविले आहे काय असा प्रश्न उपस्थित करून तसेच माँ जिजाऊ उद्यान मधील घाणीचे साम्राज्य दूर करण्याबाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिकेला जागे करण्याकरिता तेल्हारा विकास मंच युवक आघाडीच्या वतीने शुक्रवारी २४ सप्टेंबरला नगरपरिषद मध्ये ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
पालिकेने प्रवेशद्वारावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल झालेली चूक दुरुस्त करावी व माँ जिजाऊ , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानामधील घाणीचे साम्राज्य दूर करून स्वच्छता करण्यात यावी याकरिता 31 ऑगस्टला तेल्हारा विकास मंच युवक आघाडी च्या वतीने पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते तरीसुद्धा पालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदर मागण्या मंजूर करण्याबाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पुन्हा जागृत करण्याकरिता तेल्हारा विकास मंच युवक आघाडी च्या वतीने पालिके मध्ये ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.यावेळी तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर युवक आघाडी अध्यक्ष सोनू सोनटक्के स्वप्निल सुरे प्रवीण पोहरकार मोहन श्रीवास शेख ताजुद्दीन गौरव धुळे जॉन भटकर ईसाभाई विलास पवार गोवर्धन पवार वैभव तराळे अक्षय वानखडे राजेश सोळंके दिनेश सोळंके वैभव कुचके मंगेश मामनकार नितीन मानकर निलेश मानकर सोनू फ़ाटकर रवी पवार आकाश तुंबळे परिक्षित बोदळे राजेश वानखडे उदय सपकाळ राहुल मोरे पिंटू वाड़ेकर नवल वाने गोपाल गावंडे रोहन बनकर श्याम वानखडे सुपिनाथ भटकर बजरंग वानखडे विठ्ठल ठाकरे प्रफुल देशमुख वसंत हागे निलेश धारपवार इत्यादी तेल्हारा विकास मंचचे व युवक आघडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.
नगरपालिकेने दिले लेखी आश्वासन
तेल्हारा विकास मंच युवक आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पालिकेच्या १५ सप्टेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगर परिषद प्रवेशद्वारावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार मोठ्या अक्षरात देण्याबाबत मंजुरात प्रदान झालेली आहे तरी सदर सभेचे इतिवृत्त अंतिम होऊन प्रोसिडिंग बुक( ठराव पुस्तिका) वर लिहिल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल तसेच माँ जिजाऊ ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान मधील साफसफाई तात्काळ करण्यात येईल अशा प्रकारचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांनी तेल्हारा विकास मंच युवक आघाडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के यांना दिले आहे