शिबिरात परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
तिन दिवस चालले शिबीर.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/कोठी:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोठी परीसर हा आदीवासी बहुल व अत्यंत नक्षलप्रभावीत क्षेत्र असून येथील नागरीक हे आपल्या मुलभुत हक्कापासुन सदैव वंचित आहेत. अशा नागरीकांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा सामाजिक व सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल व पोलिस मदत केंद्र कोठी येथील अधिकारी व कर्मचारी नेहमी तत्पर आहेत.त्याचीच प्रचीती म्हणून पोलिस मदत केंद्र कोठी येथील परीसरातील नागरीका करीता दिनांक 20/09/2021 ते 22/09/2021 रोजी सलग तीन दिवस पोलिस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर तसेच आयुष्यमान भारत विमा गोल्डन कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले.गडचिरोली पोलीस दल व पोलिस मदत केंद्र कोठी यांच्या सौजन्याने परीसरातील नागरीकां करीता विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांकरिता लागणारी कागदपत्रे, दाखले व ऑनलाइन सुविधांची पूर्तता नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात जाऊन करावी लागत अाहे.त्यामुळे नागरिकांचा खूप वेळ व पैसे खर्च होत होता. यावर पर्याय म्हणून सर्व योजना व प्रशिक्षणाकरिता लागनारे दाखले, फॉर्म भरणे इत्यादी कामे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून पोलीस दादालोरा खिडकी या योजने अंतर्गत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले. नागरिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद व आणखी शिबिर घेण्याचा आग्रहामुळे पोलिस मदत केंद्र कोठी येथे आधार कार्ड नोंदणी व आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांचे आधार कार्ड नोंदणी व आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. सदर शिबिरामध्ये लहान बालके, वृद्ध नागरिक, तरुण मुले यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व पोलिसांचे आभार मानले.आदिवासी बहुल अक्षर शुन्य समाजात जेथे वैद्यकीय सुविधांचा अभाव व लोकांमध्ये मुळात रुजलेली अंधश्रद्धा आशा गरीब गरजु लोकांकरिता भारत सरकार यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड विमा योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंब व त्यातील सदस्याला ५ लाखाचा विमा कवच मिळतो. सदर योजनेची दादालोरा खिडकी अंतर्गत पोलिस मदत केंद्र कोठी येथे आयुष्यमान भारत कार्ड शिबीराचे आयोजन करुन नागरीकांना गोल्डन कार्ड काढुन त्यांना वैद्यकीय विमा कवच मिळवून देऊन पोलीस प्रशासनप्रती विश्वास निर्माण केला.अशा या जनकल्याणकारी आधार कार्ड व आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबीराचे पोलिस मदत केंद्र कोठी यांनी केलेले सातत्यपूर्ण यशस्वी आयोजन व परीसरातील नागरीकांनी घेतलेला लाभ त्यामुळे नागरीकांनी गडचिरोली पोलीस दल व पोलिस मदत केंद्र कोठी येथील अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले.सदर शिबिराचे यशस्वीतेकरिता अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र कोठी येथील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, पोलिस उपनिरीक्षक संजय झराड, तसेच पोलीस स्टेशन चे पोलीस अमलदार अतुल गोरले, नितीन येगोलपवार, अंकुश खंडारे, किशोर बावणे, किशोर पवार, बंडू मज्जी, सुधाकर बुर्ले, यादव मडावी, अमोल काकडे, ईश्वर पोरेटी, विलास विधाते, वशिष्ठ बावणे, किशोर वाळदे, राजेंद्र पुरी, प्रशांत जाधव, सचिन आलम, ज्ञानेश्वर केंद्रे, अजय आलम, कपिल सोयाम, सविता दुग्गा, शिल्पा बोबडे, प्रियांका बट्टे, शकुंतला सडमेक, गोपिका बाचावर, सीमा बावणे, गीतमाला गदवार, सुषमा मोहूर्ले, कोयल, मांदाले, रेणू लोणारे यांनी परिश्रम घेतले. तसेच सदर आधार कार्ड नोंदणी व आयुष्यमान भारत कार्ड शिबिरीकरिता महेंद्र कोठारे यांचे सहकार्य लाभले.


