आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते अभियानाला सुरूवात.जातीचे दाखले व शिधापञिकाचे वाटप.
गर्दी टाळण्यासाठी महसूल कर्मचारी घरपोच सेवा देणार.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:-महाराजस्व अभियाना अंतर्गत जातीचे दाखले व शिधापत्रिका वाटपाचे शुभारंभ अहेरी येथील तहसील कार्यालयात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी आ.धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय स्थानावरून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज असते. दाखला मिळविण्यासाठी गोरगरीब व दुर्गम भागातील नागरिकांची मोठी दमछाक होते. त्यामुळे अहेरी तालुक्यात मोठ्या संख्येने जातीचे दाखले तयार करून ते सुरक्षित रित्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात प्रदान करणार असून महाराजस्व अभियाना अंतर्गत नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले. तहसीलदार ओंकार ओतारी यांनी शासनाचे कल्याणकारी व लोकाभिमुख योजनेचे लाभ प्रत्येक नागरिकांना मिळण्यासाठी महाराजस्व अभियाना अंतर्गत जातीचे दाखले, रेशनकार्ड, जमिनीचे पट्टे व अन्य महत्वाचे दस्तावेज वाटपाचे मिशनच राबविण्यात येत असून शासनाच्या विविध योजना व सोयी सवलत्या पासून कोणीही वंचित राहू नये हाच त्या मागचा मूळ उद्देश असल्याचे म्हणत शासनाच्या विविध व नावीन्यपूर्ण योजना व याआधी राबविलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकले. त्या नंतर आमदार धर्मराव बाबा आत्राम व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी काही निवडक नागरिकांना जातीचा दाखला व लाभार्थ्यांना रेशनकार्ड वितरित करून महाराजस्व अभियानाचे शुभारंभ करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक साजातील तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी व्यवस्थित व सुरक्षितरित्या दाखले घरपोच वितरित करणार आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल मुक्कावार, सुरेंद्र अलोने, श्रीनिवास विरगोनवार, राहुल गर्गम आदी व प्रतिष्टीत नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी शिल्पा दरेकर, रोशन दरडे, एकनाथ चांदेकर, सत्यनारायण येनबडवार, विनोद दहागावकर, विनोद इसनकर, किशोर तलांडी, किशोर दुर्गे आदी व महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.