गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे आज दिनांक २४/०९/२०२१ शुक्रवार रोजी पाथर्डी येथे नेहरू युवा केंद्र अकोला,राष्ट्रीय वैद्यक प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद रुग्णालय अकोला, श्री समर्थ चष्माघर, स्टेशन रोड अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी यांच्यावतीने भव्य नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन श्री महादेव मंदिर भोलेनाथ चौक पाथर्डी येथे करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात महादेवाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अकोला येथील नामांकित नेत्रतज्ञ डॉक्टर श्री रवी एस ऐलानी MS Opthalm ( नेत्रतज्ञ) आयुर्वेद रुग्णालय अकोला यांनी करून शिबिराला सुरुवात करण्यात आली शिबिरामध्ये १०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ शिबिर हे घेत असताना covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करण्याची व करून घेण्याची जबाबदारी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डीच्या सर्व सदस्यांनी घेतली या शिबिरामध्ये गावातील नागरिक शाळकरी मुलं,युवक, महिला, वयोवृद्ध, सर्वांनी याचा लाभ घेतला.शिबिराला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर गजेंद्र वसो, श्रीकांत भड,संदीप भिसे, विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंटी राऊत, आशा सेविका प्रणिता कुकडे, विद्या निवाने,आशिष देठे, शाम जामोदे, राजु ईचे,मनीष भड,राजेश गोतमारे,रवी शेवाने, शुभम राऊत श्रीराम मेडिकल,श्री समर्थ चष्माघर अकोला, महाकाल ग्रुप,विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळाचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी चे सहकार्य लाभले.