किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : येथिल हिंदू स्मशानभूमी येथे दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणी गिझर बसवून त्याचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. पातूर येथिल अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने केलेल्या आवाहनाला पातूरकर प्रतिसाद देत आहेत. पातूर येथिल हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिसराची स्वछता देखभाल दुरुस्ती अभ्युदय फाउंडेशन स्वतः करीत आहे. या ठिकाणी विविध सेवा ही सेवाभावी संस्था देत आहे. अंत्यविधी साठी आणि दशक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी अभ्युदय फाउंडेशन या संस्थेने संकल्प यज्ञ व्दारे नागरिकांना आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पातूर येथिल उद्योजक बबलू बयस,योगेश पैठणकर, सतीश कवले व मित्र परिवार यांनी 25 लिटर गिझर अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला समर्पित केले. त्यानुसार अभ्युदय फाउंडेशनने गिझर बसवून नागरिकांच्या सेवेत नागरिकांसाठी समर्पित केले. त्यामुळे दशक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांना आता आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे,सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रविण निलखन, दिलीप निमकंडे, प्रशांत बंड, शुभम पोहरे, चंद्रमणी धाडसे, हनुमंत कुंडेंवर आदी उपस्थित होते.