समाधान पाटील तालुका प्रतिनिधी चिखली
चिखली – चिखली शहरातील चालक मालक संघटना लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होणार असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसंपासून रेणुका माता चालक मालक संघटनेला प्रशासना कडून त्रास देण्याचे प्रकार घडत होते. यासंधर्भात संघटने याची केफियत मनसेचे जिल्हाअध्यक्ष मदन राजे गायकवाड यांना सांगितले असता , त्यांनी मनसे संस्थापक राज साहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत तात्काळ त्यामध्ये लक्ष घालून समाधानकारक तोडगा काढून दिला. त्यामुळे संकट काळात आपल्या पाठीशी उभे राहणाऱ्या मनसेमध्ये विलीन होण्याचा निर्णय संघटनेच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या संघटनेचे अध्यक्ष आकाश गवारे, उपाध्यक्ष राजा भाऊ हरणे, सचिव गजानन घाडगे, सहसचिव रमेश खेडेकर, मंगल चव्हाण, किशोर चवरे, मुज्जू शेख, विनोद देशमुख, मनोज ठेग, संतोष सुरडकर, सुनील देशमुख, रमेश खेडेकर, हरीश अंभोरे, गणेश कोईगडे, दीपक नेवरे, विशाल जाधव, शंकर केसकर, रवींद्र चिंचोले, संजय सावंत, ऋषी आंभोरे, गजानन भगने,अमोल गवई, अनिल पाटील, बाळू सुरडकर, मनोज सापते, निलेश खुनारे, आदी सदस्य उपस्थित होते.