अभिजीत फंडाट
ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
बाळापुर : प्राथमिक आरोग्य केंद्र आगर, उपकेंद्र मोरगाव भाकरे अंतर्गत येणाऱ्या मोरगाव भाकरे,बाखराबाद, अमानतपुर,ताकोडा, खडकी टा.,बादलापुर या गावामध्ये 21 सप्टेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिवसानिमित्त 1 ते 19 वयोगटातील मुला,मुलींना जंतनाशक गोळ्या अंगणवाडी व शाळांमध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य कर्मचारी यांनी प्रत्यक्ष देखरेखीखाली खाऊ घातल्या. गैरहजर असणा-या मुलांना दि.28 सप्टेंबर रोजी माॅप अप दिनी गोळ्या दिल्या जातील.जंतामुळे मुलांमध्ये होणारे कुपोषण, रक्तक्षय यामुळे त्यांचा मानसिक व शारीरिक विकास होत नाही, थकवा येतो.ह्या जंतनाशक मोहीमेमुळे वरील आजार मुलांमध्ये होणार नाहीत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी डाॅ.जयमाला घाटे,बी.एस.वाकोडे, किरण गायकवाड,जी.एम.नागे,शितल कुकडे, सर्व गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा यांनी अथक परीश्रम घेतले.