अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव : तालुक्यात मेडशी पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर दुचाकीवरून पडलेल्या एका इसमाचा जीव वाचण्यात पोलिस वर्दीतील दर्दी जागी झाल्याने एका इसमास जीवनदान मिडल्याची घटना आज 18 सेप्टेम्बर रोजी दुपारी 3 ची घटना घडली . झाले असे की कुत्तरडोह येथील रहिवासी देवआनंद रामदास ठाकरे (27)हे आपल्या बहिणींना भेटण्याकरिता अंधारसांगवी येथे जात असतानी उमरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला यामध्ये मरनोपरांतपर्यंत अवस्थेत पडलेल्या ठाकरे यांना बघ्यांची गर्दी पाहत होती परंतु कुणी जवळ जायला तयार नव्हते यावेळी उमरवाडी कडे जात असताना मेडशी येथील पत्रकार गोरखनाथ भागवत यांनी सदर घटनेची हकीकत मेडशी पोलीस चौकीवर कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली पोलीस अमोल पाटील यांनी क्षणाचा हि विलंब न करता घटनास्थळ गाठले यावेळी अपघटग्रस्त मरणोपरांत पडले ठाकरे यांना त्यांनी आपल्या सहकारी पोलिस कॉन्स्टेबल विजेंद्र इंगोले यांच्या सहाय्याने कोणताही क्षणाचा विलंब न करता आपल्या दुचाकीवर बसून प्रथम उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी येथे आणले त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देऊन पुढील उपचाराकरिता वाशिम येथे पाठवण्यात आले एका पोलिस वर्दीतील दर्दी जागी झाल्याने एका माणसाचे जीव वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे या जगात कुठे अपघात झाला तर बघ्याची भूमिका वाढते परंतु मदत करण्याकरिता कोणते हात पुढे येत नाही ही आज प्रचिती आली वर्दीतील दर्दी जागी झाली नसती तर त्या माणसाचे काय झाले असते असा प्रश्न उपस्थित होत आहे.


