सलीम शेख
तालुका प्रतिनिधि एटापल्ली
संस्कार संस्था एटापल्ली द्वारा संचालित एटापल्ली येथील संस्कार पब्लिक स्कूल ही एक आगळे वेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विध्यार्थी विकास घडविणारी शाळा म्हणून नावारूपास येत आहे.कोरोना काळातील बंद च्या काळातही शाळेतील शिक्षकांनी व्हाट्सएपच्या,यु ट्यूब वरील विडिओ व इतर शैक्षणिक अँप च्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरूच ठेवले आहे. शाळेचे संस्थापक श्री विजय संस्कार सर हे फक्त ऑनलाईन शिक्षणातील मोबाईल, टॅब, टीव्ही यातच विध्यार्थी गुंतून राहू नये तसेच त्यांचा शैक्षणिक उत्साह वाढावा या हेतूने संस्कार मस्ती की पाठशाला अंतर्गत भिंतीवरची शाळा हा शैक्षणिक उपक्रम सुरू केलेला आहे,यात ते विध्यार्थ्यांना सायकल चालविणे, कोरोना नियम पाळून परिसरातील नगर पंचायत ने नुकत्याच रंगविलेल्या भिंतीचा शिक्षण देण्याकरिता उपयोग करीत आहेत. परिसर अभ्यास म्हणून पोस्ट ऑफिस, दवाखाना, देवालय, शासकीय कार्यालय, बँक इत्यादींची कोरोना नियम पाळून प्रत्यक्ष भेट घडवून आणत आहेत.त्यामुळे विध्यार्थ्यांना फजत ऑनलाईन शिक्षणापासून आलेला कंटाळा जाऊन शैक्षणिक उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे. विध्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांच्या गृहभेटी, शिक्षक आपल्या दारी, ऑनलाईन योगा, विध्यार्थ्यांकरिता आहार जागृती, चित्रकला, ऑनलाईन भाषण,गायन,नृत्य स्पर्धा, माझी शाळा माझी जबाबदारी, इत्यादी उपक्रम सुरू केलेले आहे.यात संस्कार पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक अमोल गजाडीवार,पूजा संस्कार व इतर शिक्षक त्यांना मदत करीत आहेत.विजय संस्कार यांनी नगर पंचायत एटापल्ली, सर्व पालक तथा सर्व कार्यालय यांचे आभार मानले आहेत,नुकताच संस्कार संस्थेला यावर्षीचा जिल्हा युवा पुरस्काराने गौरवण्यात आले होते याप्रसंगी टायगर ग्रुप एटापल्ली व संजीवनी फौंडेशन तर्फे उपविभागीय अधिकारी माननीय शुभमजी गुप्ता यांचे हस्ते विजय संस्कार यांचा शिक्षक दिनानिमित्य सत्कार करण्यात आला.