सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- अहेरी तालुका अंतर्गत येणारे उप पोलीस स्टेशन राजाराम(खा)हद्दीतील माया शंकर चेन्नम रा. गोलकरजी वय 20 वर्ष असुन ही मुलगी अनेक वर्षापासुन वेडसर असून तिचे आध्रप्रदेश राज्यातील सिकंदराबाद येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.माञ घरची परिस्थिती अत्यंत हलाखीचे व उपचाराकरिता पुरेशी रक्कम नसल्याने तिचे कुटूंबियांना उपचार करणे शक्य झाले नाही.त्यामुळे ते आपल्या स्वगावी परतले. त्यामुळे सदर वेडसर मुलगी ही गोलाकरजी परिसरातील रस्त्यात व वनात वनवन भटकत असल्याची माहीती राजाराम (खां) पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ सदरबाबत माहिती घेऊन वेडसर मुलीचे उपचाराकरिता कुटूंबियांना आर्थीक मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी उप पोलीस स्टेशचे प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे, पोलीस उपनिरिक्षक विजय कोल्हे, गणेश कड, केशव केंद्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश मानकर, औषध निर्माण अधिकारी नितीन धकाते , जिल्हा पोलीस व सिआरपीएफ चे अंमलदार हजर होते.