अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
संपूर्ण गोर बंजारा समाजाचे एकमेव पवित्र असे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथे अनेक असुविधा आहेत देशातील वेगवेगळ्या राज्यातून दररोज हजारो भाविक दर्शनाकरता या तीर्थक्षेत्रावर येतात परंतु या तीर्थक्षेत्रावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही स्वच्छता नाही ,स्वच्छता साठी सुस्थितीत शौचालय उपलब्ध नाही सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे पूजा पाठ करण्याकरता पुजारी सुद्धा पूर्णवेळ करिता नाही अनेक सुविधा या तीर्थक्षेत्रावर उपलब्ध नाही अशी वाईट अवस्था या तीर्थक्षेत्रावर निर्माण झाली असल्याने या तीर्थक्षेत्रावर श्री देवी सेवादास महाराज संस्थान रजिस्टर नंबर 625 अकोला नवीन नोंदणी क्रमांक 159 (वाशिम) या संस्थांनचे व्यवस्थापन शासनाच्या नियंत्रणाखाली आणून येथे आयपीएस आयएएस दर्जाचे अधिकारी प्रशासक म्हणून विकासाकरता नियुक्त करण्यात यावे अशी मागणी पातुर तालुक्यातील गोर बंजारा समाजाचे नेते सदाशिवराव दलसिंग चव्हाण पहाडसिंगी जिल्हा अकोला यांनी केली आहेया मागणीचे निवेदन त्यांनी 16 सप्टेंबर रोजी 2021 रोजी उप जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना दिले आहे. वास्तविक पाहता बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता आजपर्यंत अनेक सरकारांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर केलेला आहे परंतु या संस्थांनच्या विश्वस्थामध्ये वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे शासनाने मंजूर केलेला निधी खर्च झाला नाही. यामुळेच या तीर्थक्षेत्राचा विकास थांबला आहे सदर संस्थानचे विश्वस्त हे एकाच परिवारातील असल्याने सदर संस्थान सार्वजनिक संस्थान असून सुद्धा कौटुंबिक संस्थान झाले. असल्याचे सदाशिवराव चव्हाण यांनी तक्रारी मध्ये नमूद केले आहे त्याचबरोबर या मंदिराचा परकोट बांधकामासाठी लागणारे कोट्यावधी रुपयांचे बांधकाम साहित्य व निधी शासनाने उपलब्ध करून दिला होता परंतु या विश्वस्तांच्या अंतर्गत वादामुळे यांनी परकोटचे बांधकाम थांबले होते आणि आता हीच विश्वस्त मंडळी याच परकोट बांधकाम करता निधी व साहित्य उपलब्ध असून सुद्धा संत डॉक्टर संत रामरावजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून निधी गोळा करण्याकरिता जिल्ह्या जिल्ह्यात गाव तहसील व जिल्हास्तरावर बैठकांवर बैठका घेत असल्याचा आरोप जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून सदाशिवराव चव्हाण यांनी केला असून अनेक वर्षापासून सदर बांधकाम करण्यासाठी जमा केलेल्या निधीबाबत पारदर्शक माहिती न देता भावनिक आवाहन करून जनतेचे भावनिक आध्यात्मिक व आर्थिक फसवणूक करीत आहेत सदर संस्थानचे विश्वस्त व्यक्तिगत स्वार्थासाठी सतत षड्यंत्र रचून एकमेकांना फसवितात एकमेकांना अडचणीत आणतात व कोर्टकचेरीच्या वाऱ्या अखंडितपणे सुरू राहण्याकरता आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करीत आहेत.परंतु तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरता या संस्थांचे व्यवस्थापन शासनाच्या नियंत्रणाखाली आणून येथे आयपीएस आयएएस दर्जाचे अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करणे गरजेचे आहे तरी तिर्थक्षेत्राच्या विकास कामाकरता प्रशासक नेमून शासनाने पूर्ण कराव्या अशी मागणी सदाशिव चव्हाण यांनी उप जिल्हाधिकारी
प्रा .संजय खडसेअकोला यांना दिलेल्या निवेदनात मधून त्यांनी केली आहे.











