अकोला,दि.20 – राज्य निवडणुक आयोगाने कोविड-१९ प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या पोट निवडणुक कार्यक्रम पुनश्च जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार तालुकानिहाय निवडणुक विभाग व निर्वाचक गणातील छाननीनंतर वैध उमेदवारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र | तालुका | निवडणुक विभागातील वैध उमेदवारांची संख्या | निर्वाचक गणातील वैध उमेदवारांची संख्या |
1 | तेल्हारा | 19 | 21 |
2 | अकोट | 15 | 20 |
3 | मुर्तिजापुर | 10 | 19 |
4 | अकोला | 26 | 28 |
5 | बाळापुर | 11 | 27 |
6 | बार्शिटाकळी | 8 | 26 |
7 | पातुर | 6 | 20 |
एकुण | 95 | 161 |
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीची वैध उमेदवारांची यादी मंगळवार दि. २१ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल. नामनिर्देशनपत्र स्विकार करणे किंवा ते नामंजुर करण्याबाबतचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख शुक्रवार दि. २४ सप्टेंबर २०२१ आहे. अपिलांवर जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख सोमवार दि. २७ सप्टेंबर आहे.
जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा सोमवार दि. २७ सप्टेंबर असुन उमेदवारी मागे घेण्याबाबत जेथे अपिल नाही तेथे सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत राहील, तसेच जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत राहील.
निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करुन चिन्ह वाटपाची तारीख जेथे अपिल नाही तेथे सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन नंतर राहील तसेच जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन नंतर राहील.
अकोला जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचे मतदानाची तारीख मंगळवार दि. ५ ऑक्टोबर असुन बुधवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजतापासुन मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निवडुन आलेल्या सदस्यांची नावे शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर रोजी पर्यंत प्रसिध्द करण्यात येतील. राज्य निवडणुक आयोगाकडुन प्राप्त पोट निवडणुक कार्यक्रमाची आचारसंहिता संबंधित क्षेत्रात दि. १३ सप्टेंबर २०२१ पासुन लागु झाली असुन आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पत्राव्दारे कळविले आहे.