साथसेवक फाऊंडेशन व द प्रोफेशनल कॅरिअर अकॅडमी यांचा स्तुत्य उपक्रम
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साथसेवक फाऊंडेशन व द प्रोफेशनल करिअर अकॅडमी यांच्या सयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मध्ये चित्रकला स्पर्धा चे आयोजन दि २७.०९.२०२१. वेळ स. १० वाजता विषय : १) सुंदर माझी शाळा २) बाल गणेशा ३) कोरोना जनजागृती ४) वृक्षारोपण करणारी मुले निबंध स्पर्धा दि. २८.०९.२०२१. वेळ स. १० वाजता विषय : १) कोरोना काळातील शाळेची अवस्था २) ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान ३) झाडे लावा जीवन वाचवा ४) माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा वकृत्व स्पर्धा दि. २९.०९.२०२१. वेळ स. १० वाजता विषय : १) माझा बाप शेतकरी २) कोरोना शाप की वरदान ३) बेरोजगारी आणि कोरोना ४) महात्मा गांधी आणि भारत ५) वृक्षसंवर्धन काळाची गरज टिप : बोलण्याची वेळ : ४+१ (मिनीट) रांगोळी स्पर्धा दि.०२.१०.२०२१. वेळ स. १० वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत तरी ह्या आयोजनाचा स्पर्धकानी लाभ घ्यावा. स्पर्धकांनी रांगोळी सोबत आणावी सर्व स्पर्धांचे व बक्षिस वितरणाचे ठिकाण द प्रोफेशनल करिअर अकॅडमी, पातूर बक्षिस वितरण दि.११ ऑक्टोंबर २०२१, स. १० वाजता बक्षिसांचे स्वरुप प्रथम, द्वितीय, तृतीय (प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह) (सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल) अधिक माहीती करीता पंकज सुरेश पोहरे,अजय दगडू कवडे मो. 8855995792 मो 7378404292 ह्या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजन समिति तर्फे करण्यात आले आहे.