शुभम गावंडे
ग्रामीन प्रतिनिधी बहाद्दरपूर
अकोला – जातीपातीच्या दंगलीत रक्त सांडविल्या पेक्षा रक्तदान करुण इतरांना जिवनदान देन हे आपल कर्तव्य आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेउन आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य आणी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ कौलखेड जहागिर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी तब्बल 21रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली समाजा प्रती असलेली मुख्य जबाबदारी पार पाडली.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन संपुर्ण देशाला अंधारातून प्रकाशमान केल.इतरांना आनंदाने जगता यावा म्हणून महाराजांनी स्वताच रक्त सांडवुन आपला जीव प्राण प्राणपणाला लावला.जे स्वताच रक्त इतरांचा जीव वाचविण्यासाठी देतात ते खरे शिवाजी महाराजांचे मावळे असतात.आणी अशा मावळ्यांचा सन्माण व्हावा या उद्देशाने आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी प्रतेक रक्तदात्याल छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणी प्रमाणपत्र भेट म्हणून दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसती आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील धांडे,अतुल भांगे,ब्रम्हा सर,इंगळे सर,पवन ,त्याच प्रमाणे ज्यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले अशा सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ कौलखेड जहागिर चे अधक्ष धीरज तायडे,व सरपंच सुरज तायडे,सानी तायडे,रोहित तायडे,शुभम तायडे,प्रीतम तायडे,भुषण तायडे,तुषार तायडे,अभय तायडे,दिप तायडे,अभिजित तायडे,संकेत तायडे व ग्रामस्थ व रक्तदाते मोठ्या संखेने उपस्तीत होते.