शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
अकोट : येथील उपविभागीय पोलीस अधिकारीपदी रितू आयपीएस खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश दिले असून ११ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर थेट आयपीएस दर्जाच्या महिला अधिकारी मिळाल्या आहे. श्रीमती रितू या भारतीय पोलीस सेवेतील २०१८ च्या तुकडीमधील पोलीस अधिकारी आहेत. सातारा जिल्हा येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची शासनाने पहिली नियुक्ती अकोट येथे केली. गत नोव्हेंबर २०२० पासून एसडीपीओ पद रिक्त होते.
शेतकरी कुटुंबातीलआयपीएस
आयपीएस रितू खोकर ह्या महिला पोलीस अधिकारी हरियाणामधील पानिपत येथील असून, यूपीएससीच्या २०१७ च्या परीक्षेत त्यांनी १४१ वा रँक मिळविला आहे. त्यांना कुरुक्षेत्र विश्व महाविद्यालयात एमएससी गणित विषयात गोल्डमेडल मिळाले होते. त्यामुळे त्यांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सन्मानित केले होते. शेतकरी कुटुंबातील रितू खोकर यांचे वडील ताराचंद व आई सुनितादेवी हे दोघेही गावचे माजी सरपंच राहिलेले आहेत. त्यांना महाराष्ट्र कँडर मिळाले होते. त्यांचे सातारा जिल्ह्यात परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला आहे.