पातुर तालुक्यात 144 गणेश मूर्तीचे विसर्जन सोहळा शांततेत संपन्न.
किरणकुमार निमकंडे / अकोला
पातुर शहर आणि पातुर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे स्थापना करणे करण्यात येत असलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत आणि उत्साहात मध्ये रविवारी करण्यात आले यावेळी” तेल बुदली” तलावावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे पातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांनी स्थापना केलेल्या घरगुती गणपतीचे विसर्जन सुद्धा याठिकाणी केले विधिवत पूजा प्रसादाचे वाटप करण्यात आले यासोबतच पातूर शहर शहरातील मान्यवर गणपती विसर्जन याठिकाणी करण्यात आले यावेळी पातूरचे तहसीलदार दीपक बाजड पातुर पोलिस स्टेशनचे पीएसआय रत्नपारखी , पोलीस कर्मचारी राम आंबेकर, निलेश पिंगळे तसेच पातुर तहसील मंडळ अधिकारी तलाठी तालुका कृषी अधिकारी सुरेश ईवनाते यांच्यासह अधिकारी-कर्मचारी पत्रकार बांधव अविनाश पोहरे ,सय्यद हसन बाबू, प्रहार सेवक अमोल करवते यांची उपस्थिती होती. यावेळी अनेक गणेश मंडळांनी पातुर तालुका पातुर शहर अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशातून हद्दपार झाला पाहिजे आणि देश कोरोना मुक्त झाला पाहिजे अशी प्रार्थना गणरायाला करून निरोप दिला.पातुर तालुक्यात शहर व ग्रामीण भाग पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 144 गणपतीची स्थापना करण्यात आली होती यामध्ये पातुर शहरात एकूण 17 गणपतीची स्थापना झाली होती तसेच ग्रामीण भागात पोलिस स्टेशन अंतर्गत 54 गणपतीची स्थापना करण्यात आली होती त्यापैकी एक गाव एक गणपती एकवीस असे एका तर गणपतीची स्थापना करण्यात आली होती तर पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण सार्वजनिक गणपती 73 ची स्थापना करण्यात आली होती शहर भागात 2 ग्रामीण भागात एक गाव एक गणपती 12 अशी होती पातूर तालुक्यात गणपती उत्सवाचे पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पातूरचे ठाणेदार हरीश गवळी चांन्नी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पातुर तालुक्यात पोलिसांचा बंदोबस्त चोख होता कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही.सध्या संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात कोरोना का प्रादुर्भाव असून महाराष्ट्र मध्ये रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे त्यामुळे शासनाने जारी केलेल्या निर्बंधांचा गणेश विसर्जन गर्दी टाळण्यासाठी अकोला पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन तसेच पोलीस स्टेशन यांच्या वतीने सूचना दिल्या देण्यात आल्या होत्या या सूचनेनुसार पातुर तालुक्यातील गणेश मंडळांनी श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पाडले यावेळी पातुर चे तहसीलदार दीपक बाजड आणि मंडळ अधिकारी तलाठी पत्रकार बंधू पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य यांनी विसर्जन स्थळावर भेटी देऊन या उत्सवाला शांततेत पार पाडण्याकरता मदत केली.