किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
ग्राम शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघात कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. डी. व्ही. चहाकार यांनी केले. न्यायाधीश एम. बी. पठाण साहेब अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पातुर यांनी जेष्ठ नागरिक कायदा 2007 बाबत सविस्तर माहिती दिली. आपल्या कुटुंबात मुलांकडून किंवा इतर कुटुंबीयांकडून अवमान होत असेल अथवा छळ होत असेल त्यांनी उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करावा त्यांना यथोचित न्याय निश्चितच मिळेल
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सरपंच अर्चना ताई शिंदे, उपसरपंच कल्पनाताई खर्डे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे, रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे, ह. भ. प राजु महाराज कोकाटे, वीर पिता काशीराम निमकंडे, गुलाबराव कोकाटे, सुहास कोकाटे, सुरेंद्र गाडगे, रामकृष्ण खंडारे, श्री शिंदे, गणेशराव अंधारे, अनंता अंधारे, गजानन. वि. अंधारे, श्रीकृष्ण रा.अंधारे , दयाराम निमकंडे, उकर्डा ढाळे, काशीराम ढाळे, डी. एस. इंगळे, संजय गिऱ्हे, रामदास सावरकर, रमेश वरणकार, पांडुरंग हिरळकर, विनायक निलखन, हेमंत घुगे, संजय ढाळे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती . यावेळी सरपंच अर्चना ताई आणि उपसरपंच कल्पनाताई यांचे हस्ते वृक्षारोपण करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला











