अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
निंबाफाटा:- बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या निंबाफाटा येथे उरळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली निंबाफाटा येथे गणेश विसर्जना निमित्त रुट मार्च काढण्यात आला. उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गावातील नागरिकांना आवाहन केले कि गणेश विसर्जन करता वेळी कोणत्याही प्रकारची मिरवणुक किंवा ढोल तासे न वाजवता व अगदी साध्या पध्दतीने व शांततेत गणेश विसर्जन करावे असे उरळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांनी नागरिकांना सांगितले. रुट मार्च काढतांना प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार अनंतराव वडतकार, राजेंद्र मोरे ( पि. एस. आय), राजाभाऊ बचे साहेब, किशोर पाटील साहेब, दिनकर इंगळे साहेब, नंदु सुलताने साहेब, घुगे साहेब, भोजने साहेब, प्रविण लाड साहेब, राजेंद्र राऊत साहेब, मुळे साहेब, इंगळे मॅडम व सर्व पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.