किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : येथिल स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण पातुर व्दारा संचालित स्व.विनायक राखोंडे स्मृती गणेशोत्सव मंडळ, कान्होबा चौक पातुर व राखोंडे परिवारांनी आपल्या गणपती समोर साकारला भारत की आझादी का अमृत महोत्सवाचा तसेच आझाद हिंद सेनेचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती निमित्य साकारला आकर्षक देखावा.
गेल्या २२ वर्षा पासून श्री नामदेवराव मो.राखोंडे गुरुजी यांनी पातुर शहरात धार्मिक, पारंपारीक व सामाजिक सांस्कृतिक हालचाल करणारे व बोधक व संदेश देणारे देखावे साकारत असुन त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना व मंडळाला महाराष्ट्र शासनाचा तालुका व जिल्हास्तरिय गणेशोत्सव सजावट पुरस्कार मिळाले आहे आणि त्यांची ही परंपरा त्यांचे मुले सागर राखोंडे व विशाल राखोंडे यांनी चालु ठेवली आहे. गेला ९ वर्षापासुन प्रतिष्ठाण व गणेशोत्सवाची नोंदणी करुन १० दिवसीय युवा महोत्सव व सांस्कृतिक व सामाजिक कार्य तसेच विविध उपक्रम राबवत आहे तसेच मागील वर्षी कोरोनाच्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानात सहभागी होऊन सन.२०२० – २१ चा जिल्हा युवा (संस्था) पुरस्कार हा प्रतिष्ठाणाला मिळाला आहे. तसेच यावर्षी २३ वे वर्ष असुन कोरोना संकटामुळे शासनानी दिलेल्या नियमांचे पालन करत आपला गणेशोत्सव साद्या पध्दतीने साजरा करत रक्तदान व स्वच्छता, व्यसन मुक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्षारोपना बाबत संदेश देत यावर्षीचा अमृत महोत्सवाचा देखावा हा भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जिवाचे बलीदान देणारे वीर सेनानी व थोर महात्मे व महिला व पुरुषांना समर्पित केला असुन सदर देखावा हा सागर राखोंडे, विशाल राखोंडे, पल्लवी मांडवगणे, शुभांगी उमाळे व ज्योती राखोंडे व राखोंडे परिवारांच्या संकल्पनेतून तयार केला आहे.











