महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.17:-ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी ऋतु सिद्धार्थ पेटकर हिने शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया बाबतमार्गदर्शनदिले.विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व व उत्पादन वाडी वाडी बाबत माहिती पटवून दिली प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रत्येक बियाण्यांची बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असतं रोगकारक बुरशीचा नायनाट होतो पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण होते ही माहिती देतेवेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना वीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्यासाठी रायझोबियम या घटकाचा वापर केला.यावेळी विजय मध्ये पाटील (शेतकरी) बाबुराव चामाटे (शेतकरी) यांची उपस्थिती लाभली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं आर.अ. ठाकरे उपप्राचार्य श्री.एम.व्हि.कडू सर, कार्यक्रम अधिकारी शुभम सरफ सर, विषय तज्ञ डॉं. प्रतिक बोबडे सर, के.टी. ठाकरे सर, ए.ए डोंगरवार सर ,यांचे विद्यार्थिनीला मार्गदर्शन लाभले.