द प्रोफेशनल करिअर अकॅडमी व साथ सेवक फाउंडेशन चा अनोखा स्तुत्य उपक्रम..
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर – दि : 16/09/2021 रोजी जागतिक ओझोन दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून तसेच पर्यावरणाची होणारी हानी व त्यामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अवेळी आलेला पाऊस,कोरोना काळात ऑक्सिजनचा असलेली तुटवडा व नैसर्गिक आपत्ती व संकटांना सामोरे जावे लागत आहे. वृक्षतोडीमुळे मनुष्याच्या स्वार्थापायी लाखो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वाशिम आकोला तसेच पातुर बाळापुर महामार्गावर झालेली हजारो वृक्षांची कत्तल भविष्यात आपल्याला धोका निर्माण करीत आहेत. वृक्षसंवर्धनाचा तसेच पर्यावरणाचे हित लक्षात घेता पातुर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक व कला क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे तसेच साथ सेवक फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय राऊत, साथ सेवक अजय कवडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज रोजी जागतिक ओझोन दिनानिमित्त वृक्ष लागवड करून एक नवा संकल्प निर्माण केला. सदर वृक्षलागवड ही बुद्धभूमी शिर्ला येथे करण्यात आली. यावेळी वृक्ष लागवड करून पर्यावरण वाचवण्याच्या निर्धार केला. व सर्वांनी एक वृक्ष लावावे व ते जगवावे असे आवाहन द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी जनतेला केले. एवढेच नाही तर आगामी काळात दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला.