राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आष्टी/गडचिरोली – महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांनी व महात्मा फुले समता परीषदेने, घटनेने दिलेले ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे, अशी मागणी केलेली होती. त्यासाठी निवेदने दिलीत, आंदोलने केलेत. त्याचे प्रतिफळ, गडचिरोली, चंद्रपूरसह महाराष्ट्रातील 8 जिल्याना मिळालेल्या आरक्षणाचे चे जल्लोषात स्वागत करून, शिवमुद्रा संघटनेचे अध्यक्ष गोलू पोटवार यांनी जात निहाय जनगणना करून जितकी टक्के ओबीसी ची संख्या आहे तितके टक्के आरक्षण मिळत पर्यंत लढत राहू असे मनत संघटनेला आष्टी, ईल्युर, ठाकरी, कुणघाडा, अनखोडा, मर्कडा, तसेच संपूर्ण जिल्यातील जास्तीत जास्त युवा एकत्र येऊन मोठा लढा निर्माण करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील आठ आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासींची लोकसंख्या विचारात घेवून, त्यामधे वाढ करण्यात यावी, या सर्वोच्च न्यायालयाचा व विविध केंद्रिय अधिसुचनांचा विचार करून, महाराष्ट्र शासनाने २००२ साली, या जिल्ह्यांमधील आदिवासींचे आरक्षण सात टक्क्यांवरून २४ टक्के पर्यंत वाढविले. परंतु ते करीत असतांना मात्र, महाराष्ट्रात सर्वत्र १९% हे ओबीसी आरक्षण असतांना या आठ जिल्ह्यात फक्त ओबीसींच्या आरक्षणाला कात्री लावण्यात आली. त्यामुळे गडचिरोली६%, चंद्रपुर ११%, यवतमाळ १४% तर नाशिक, नंदुरबार, धुळे, पालघर, रायगड या जिल्ह्यात अवघे ९% ओबीसी आरक्षण ठेवण्यात आले होते. ओबीसींच्या या कमी केलेल्या आरक्षणाची तफावत ही महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत खटकत होतीच. पण त्याचा परिणाम हा वर्ग क आणि ड मधील त्या जिल्ह्यातील जिल्हा समिती मधुन भरल्या जाणार्या शासकीय सरळ सेवेने नोकरभरतीवर मोठ्या प्रमाणावर होत होता. पटवारी, पोलीस, ग्रामसेवक आणि ईतर क व ड नोकरभरतीमधे ओबीसी युवकांवर, आपल्यावर अन्याय झाल्याची भावना होत होती. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या ५०% चे वर असुनही, केवळ ६% आरक्षणावर ओबीसींना समाधान मानावे लागत होते. त्यामुळे या आठ आदिवासी बहुल जिल्ह्याप्रमाणेच, महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांनी व महात्मा फुले समता परीषदेने, घटनेने दिलेले ओबीसी आरक्षण, या जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण पुर्ववत करावे, अशी मागणी केलेली होती. त्यासाठी निवेदने दिलीत, आंदोलने केलेत!
मिळालेल्या आरक्षण चे जल्लोषात स्वागत करून शिवमुद्रा संघटनेचे अध्यक्ष गोलू पोटवार यांनी जात निहाय जनगणना करून जितकी टक्के ओबीसी ची संख्या आहे तितके टक्के आरक्षण मिळत पर्यंत लढत राहू असे मनत संघटनेला आष्टी, कोणसरी, ईल्युर, ठाकरी, कुणघाडा, अनखोडा, मर्कडा, व समस्त जिल्हातील जास्तीत जास्त युवा एकत्र येऊन मोठा लढा निर्माण करण्याचे आवाहन केले. या वेळी शिवमुद्रा संघटनेचे अध्यक्ष गोलू पोटवार, चेतन कारेकार, संदीप तीवाडे, रतन पोतगंटवार, वैभव पाल, अक्षय हंनमलवार, सूरज बोलगोडवार, श्याम ठाकूर, अमीत नगराळे, अनिकेत बोंडे, सूरज सोयाम, पिंकू बोरकुटे, अक्षय माडेमवार, लाला चवरे, गणेश तीमाडे, अंकुश खामनकर, सागर वाकुडकर, अक्षय वाभिटकर, करण येलमुले, सूरज बावणे, प्रांकित धुमने, आदित्य पटले, यश भोयर, अम्मु आंबटकर, निसर्ग पेदापल्लिवार, प्रतीक गोविंदवार, योगेश पोतगंटवार,रोहित गटलेवार, प्रवीण कुद्रपवार, जितू काळे, हिमांशू सोमनकर इत्यादी ओबीसी युवा उपस्थित होते.

