सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर दि.१६ सप्टेंबर रोजी चिखली येथील पत्रकार समाधान गाडेकर वृत्तसंकलनासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दमदाटी व धक्काबुक्की केलेल्या उपपोलीस निरिक्षक निलेश शेळके व पोलीस कॉ दीपक वायाळ यांच्यावर कारवाई करुन निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड व तहसीलदार यांना मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.(दि.१४) गांजा पकडण्यात आला आहे त्यांना माहीती मिळतात स्थानिक पत्रकार समाधान गाडेकर हे वृत्तसंकलनासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके व पोलीस कॉ दीपक वायाळ यांनी दमदाटी व धक्काबुक्की करून मोबाईल हिसकावून घेतला त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची या ठिकाणी मुस्कटदाबी झाल्यामुळे मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना 16 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर मेहकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष जुगराज पठ्ठे, रफिक कुरेशी, सिध्दैश्वर पवार, प्रविण गायकवाड, सुनिल् मोरेसंतोष मलोसे संतोष अवसरमोल, निलेश नाहटा, भरत सारडा, फिरोज शाह, विवेक देशमुख, ओमप्रकाश देवकर,युनुस बागवान, ज्ञानेश्वर इंगळे उध्दव फंगाळ,अमर राऊत,प्रदिप जोशी,निसार अंसारी,महेबूब भाई,सादिक कुरेशी,संदिप ढोरे, मुन्ना काळे,अॅड श्याम काळे, रविंद्र वाघ,गजानन देशमुख, सुभाष नरवाडे, मेहकर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.