-विनोद बोरेंच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली बोरे गाववासिय-स्वप्नपूर्ती मिडिया परिवाराचा उपक्रम
सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा राजकारणात सक्रीय असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. सुनिल पाटील तिफणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. साहित्यिक विनोद बोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर सुलतानपूर रोडस्थित शिवमंदिरात पडद्यामागचे नायक पुस्तक वितरण सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवारी ता. 17 रोजी आयोजित करण्यात आला आहे. चिंचोली बोरे गावकरी मंडळी व स्वप्नपूर्ती मिडिया परिवाराच्या वतीने उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यावसायिक तनशीराम पाटील मानघाले हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, मातोश्री हॉस्पीटलचे संचालक डॉ. पंजाबराव शेजुळ, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विलासराव तेजनकर, सुप्रसिद्ध व्यावसायिक सुधाकरराव गारोळे, युवक कॉंग्रेसचे महासचिव दिलिप बोरे, सरंपचपती अनंथा बोरे, पोलिस पाटील पंकज राजगुरू, प्रगतशिल शेतकरी शिवाजी द. बोरे हे राहणार आहेत. यावेळी प्रल्हाद राजगुरू, दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी सिद्धेश्वर पवार, सुप्रसिद्ध रांगोळीकार कृष्णा सासवडकर, पाटलाचा वाडा हॉटेलचे मालक गजानन गारोळे, अरुण बोरे, विशाल मधुकर राजगुरू यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.











