हिरा आसलकर
शहर प्रतिनिधी मलकापूर
मलकापूर : तहसील कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांना लागणारे कागद पत्र,दाखले हे निवळ सेतु लिपीकाच्या हलगर्जीपणा मुळे विद्यार्थ्यांना एडमिशन साठी वेळेवर दाखले मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत वारंवार विद्यार्थी व पालक वरिष्ठ अधिकार्याकडे चकरा मारत असतात.तरीही हे काम वेळेवर होत नसते तर याचा जबाबदार कोण अशी मागणी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी संघटनेचे पदाधिकारी आकाश लटके, नीतिकेश खोडके, संजय खेवलकर, आशिष चुनाडे, सागर जयस्वाल, देवी टाक, सुपेश बोंबटकार आदी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले.